शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (13:14 IST)

पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा संशयीत सापडला

कोरोना व्हायरसचे केरळमध्ये याचे तीन रूग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पंजाबमध्ये एक संशयित रूग्ण सापडल्याचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबच्या फरीदकोटमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला संशयास्पद रूग्ण सापडला आहे. हा रूग्ण 42 वर्षांचा असून त्याचे नाव गुरजिंदर सिंह आहे. गुरजिंदर हे 10 दिवसांपूर्वी 26 जानेवारीला चीनहून कॅनडा आणि कॅनडाहून भारतात आले होते.
 
हा रूग्ण वैद्यकीय तपासणी आणि औषधे घेण्यास नकार देत आहे. यामुळे पोलीससुद्धा या प्रकरणात लक्ष देत आहेत. सध्या या रूग्णाला वैद्यकीय तपासणीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
केरळामध्ये कोरोना व्हायरसचे तीन पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्यानंतर राज्याने यास राज्य आपत्ती जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी हे आदेश दिले. केरळात कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेले तीन रूग्ण हे विद्यार्थी आहेत आणि काही दिवसांपूर्वीच ते चीनच्या वुहान शहरातून परतले होते.