रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:16 IST)

टेरर मॉड्यूलचा पर्दाङ्खाश; चार अतिरेकंना अटक

जम्मूकाश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त   कारवाईमुळे जैश-ए-मोहम्द या अतिरेकी संघटनेच्या टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. लष्कराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवंतीपोरा येथे जैशए-मोहम्दच्या चार अतिरेक्यांना अटक केली असून या चारही जणांची कसून चौकशी सुरू आहे.
 
राज्य पोलिसांना अवंतीपोरा येथे जैशसाठी काही लोक काम करत असल्याची खबर लागली होती. त्यामुळे सुरक्षा दलाच्या सहकार्याने पोलिसांनी अवंतीपोरा येथे संयुक्त मोहीम हाती घेऊन चार अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या. या चारही अतिरेक्यांकडे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर संदिग्ध साधनसामुग्री आढळली आहे. स्थानिक पातळीवर जैशला मदत करण्याचे काम हे चारही जण करत असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे.