सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

आयपीएल २०२० ची फायनल मुंबईत

इंडियन प्रिमीयर लीग अर्थात ipl 2020 ही स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतला अंतिम सामना म्हणजेच फायनल मॅच २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला. याचसोबत बैठकीत सामन्यांची वेळ रात्री ८ हीच कायम ठेवण्यात आलेली आहे. काही संघमालकांनी सामने रात्री साडेसात वाजता सुरु करावे अशी मागणी केली होती, मात्र बैठकीत वेळेत कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. 
 
याचसोबत या हंगामात केवळ ५ Double Header सामने होतील. “आयपीएल सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. आधीप्रमाणेच सामने रात्री ८ वाजता सुरु होतील. रात्री साडेसात वाजता सामने सुरु करण्याबद्दल चर्चा झाली, पण त्यावर एकमत झालेलं नाही. आयपीएलचा अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत खेळवला जाईल, आणि यंदाच्या हंगामात केवळ ५ Double Header सामने असतील.” बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पत्रकारांना माहिती दिली.