मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , शनिवार, 25 जानेवारी 2020 (16:47 IST)

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट अव्वलस्थानी कायम

ICC Test rankings remain at the top spot
विराट कोहलीचे कसोटी क्रमवारीतील अव्वलस्थान कायम राहिले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत, विराट 928 गुणांसह पहिल्या स्थानी कायम असून, अजिंक्य रहाणे आठव्या स्थानी आला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौर्‍यावर आहे. या दौर्‍यात भारतीय संघ 5 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंडचा दौरा हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 
 
आसीसीची कसोटी क्रमवारी
1) विराट कोहली (928 गुण),
2) स्टिव्ह स्मिथ (911 गुण),
3) मार्नस लाबुशेन (827 गुण),
4) केन विलियम्सन (814 गुण),
5) डेव्हिड वॉर्नर (793 गुण),
6) चेतेश्वर पुजारा (791 गुण),
7) बाबर आझम (767 गुण),
8) अजिंक्य रहाणे (759 गुण),
9) जो रुट (752 गुण),
10) बेन स्टोक्स (745 गुण).