गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शनिवार, 25 जानेवारी 2020 (12:27 IST)

सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढे माझ्याकडे पैसे आहेत

Sehwag has no hair on his head as much as I have money
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागवर टीका केली आहे.
 
तीन वर्ष जुन्या व्हिडिओसंबंधी बोलताना शोएब अख्तरने सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढे माझ्याकडे पैसे आहेत असे म्हटले आहे. एक व्हिडीओ सध्या व्हारल झाला आहे. हा व्हिडिओ माझा मित्र सेहवागचा आहे. त्याने शोएब अख्तर पैशांसाठी भारताची स्तुती करतो असे म्हटले आहे, असे शोएब व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

सेहवगाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शोएबने म्हटले आहे की, संपत्ती अल्लाह देतो भारत नाही. जेवढे सेहवागच्या डोक्यावर केस नाहीत, तेवढे माझ्याकहे पैसे आहेत. यानंतर शोएबने लगेचच ही मस्करी असल्याचे स्पष्ट केले. मीश्किील पद्धतीने हे बोलत आहे. कृपया हा एक जोक म्हणूनच घ्या, असेही यावेळी शोएबने सांगितले.

2016 मध्ये एका चॅट शोमध्ये बोलताना सेहवागने म्हटले होते की, शोएब अख्तर आमचा चांगला मित्र  झाला असून, भारतात व्यवसाय सुरु करायचा असल्याने तो भारताचे कौतुक करत असतो. तुम्ही त्याच्या मुलाखती पाहिल्यात तर लक्षात येईल की, भारताबद्दल तो इतक्या चांगल्या गोष्टी बोलत आहे ज्या त्याने  कधी पाकिस्तानकडून खेळत असताना बोलल्या नव्हत्या.