शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (10:54 IST)

भगवान परशुरामांची कथा

रामायणाच्या काळात भगवान परशुराम भिक्षुक असे. पूर्वीकाळी गाधी नावाच्या राजाने कन्नोज नावाच्या शहरात राज्य केले. त्यांना सत्यवती नावाची एक सुंदर कन्या होती. राजा गाधीने सत्यवतीचं लग्न ऋषी भृगुनंदन यांच्या पुत्र ऋषीक यांसह केले. लग्नानंतर ऋषी भृगु यांनी आपल्या सुनेला आशीर्वाद देऊन वर मागण्यास सांगितले. सत्यवतीने आपल्या सासऱ्यांना आनंदित झालेले बघून आपल्या आईसाठी पण एका पुत्र प्राप्तीसाठीची विनवणी केली. सत्यवतीच्या विनवणीला मान देऊन भृगु ऋषींनी तिला दोन चरस पात्र दिले आणि म्हणाले की ज्यावेळी ऋतु स्नान केल्यावर तुझ्या आईला पुत्र प्राप्तीची इच्छा होईल तेव्हा आपल्या आईला पिंपळाला कवटाळायला सांगावे आणि तसे तू पण तशीच इच्छा करून औदुंबराला कवटाळावे, आणि मी दिलेल्या चरू पात्रांचे वेगळे वेगळे सेवन करावे. इथे सत्यवतीच्या आईला हे कळल्यावर की ऋषी भृगुंनी आपल्या सुनेला उत्तम अपत्य होण्याचं चरूपात्र दिले आहे. तिने आपल्या चरुपात्राला आपल्या मुलीच्या चरू पात्राशी बदलून दिले. 
 
सत्यवतीला या संदर्भात काहीच ठाऊक नव्हते. ती आपल्या आईला दिलेले चरूपात्राचे सेवन करते. भृगुंना आपल्या योगशक्तीने घडलेले सर्व समजते. ते आपल्या सुनेजवळ येऊन तिला सांगतात की तुझा आईने तुझ्या बरोबर छळ केले आहे. त्यामुळे तुला होणारी संतान ब्राह्मण असूनही क्षत्रिय सारखी वागणार आणि तुझा आईला होणारं मुलं क्षत्रिय असूनही ब्राह्मणासारखा वागणार. हे ऐकल्यावर सत्यवती भृगू यांना विनवणी करते की आपण असे आशीर्वाद द्यावे की माझं मुलं ब्राह्मणा सारखाच वागावं. शक्य असल्यास माझं नातू क्षत्रिय असावा. ऋषी भृगुंनी तिच्या विनवणीला मान दिले आणि तिची विनवणी स्वीकारली.
 
वेळ आल्यावर सत्यवतीच्या पोटी जमदग्नी जन्मले ते अत्यंत तेजस्वी होते. त्यांचा विवाह प्रसेनजीत यांची मुलगी रेणुकेशी झाले. रेणुकेच्या पोटी त्यांना 5 अपत्ये झाली. त्यांचे नाव रुक्मवन, सुखेंनु, वासू, विश्ववनस आणि परशुराम. 
 
एकदा रेणुका नदीमध्ये स्नानासाठी गेली असताना तिने तिथे चित्ररथाला पाण्यात खेळताना बघितले. त्याला बघून ती त्याच्यावर आसक्त झाली. जमदग्नींना त्यांचा दैवीय ज्ञानाने रेणुकेच्या मनातले समजले. ते फार कोपले आणि त्यांनी आपल्या मुलांना आईला ठार मारायला सांगितले. रक्मवन, सुखेंनु, वासू, विश्ववनस यांनी आपल्या वडिलांची आज्ञांचे काही पालन केले नाही. पण परशुरामाने  आपल्या वडिलांना काहीही न विचारता त्यांचा आज्ञेचे पालन केले आणि आईचे शिरच्छेद केले. आपली आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांनी श्राप देऊन 4 ही मुलांना स्थिर केले आणि परशुरामाला वर मागण्यास सांगितले. त्यांनी आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले आणि त्यांना कुठल्याही घटित घटनांची आठवण होऊ नये असे म्हटले. तसेच माझे 4 ही भावांना परत जागृतवस्था प्राप्त होवो. तसंच मी युद्धामध्ये कोणाकडूनही परास्त होऊ नये आणि मला दीर्घायुष्य प्राप्त होवो. ऋषी जमदग्नी यांनी परशुरामास वर दिले. 
 
काळांतरानंतर ऋषी जमदग्नींच्या आश्रमामध्ये कार्तवीर्य अर्जुन आले. ऋषींनी त्यांचा कडील कामधेनू गायीच्या साहाय्याने त्यांचे आतिथ्य केले. कामधेनू गायीचे वैशिष्ट्ये बघून कार्तवीर्य अर्जुनाने कामधेनूची मागणी ऋषींकडे केली. ऋषीने नकार दिल्यावर कार्तवीर्य अर्जुनांनी ऋषी जमदग्नीचे वध केले आणि कामधेनूला आपल्या बरोबर बळजबरीने स्वर्गात नेण्याचे प्रयत्न करीत असताना कामधेनू स्वर्गात निघून गेली. कार्तवीर्य अर्जुनाला कामधेनूला न घेता परतावे लागले. 
 
या घटनेच्या वेळेस परशुराम तेथे नव्हते. ते परतल्यावर त्याने आपल्या आईला विलाप करीत असताना बघितले. आपल्या वडिलांची आणि आश्रमाची अवस्था बघून त्याने संतापून पृथ्वीवरून संपूर्ण क्षत्रियांचे नायनाट करण्याचे प्रण केले. वडिलांचे अंत्यसंस्कार करून आल्यावर त्यांनी सहस्त्रबाहु अर्थात कार्तवीर्य अर्जुनाशी लढून त्याला ठार मारले. नंतर त्याने पृथ्वीला 21 वेळा क्षत्रियांपासून मुक्त केले. क्षत्रियांच्या रक्ताने सामंतपंचक क्षेत्राचे 5 तलाव त्यांनी भरले. 
 
शेवटी महर्षी ऋचीक यांनी परशुरामाला असे करण्यास रोखले. तत्पश्चात भगवान परशुराम यांनी ब्राह्मणांना संपूर्ण पृथ्वी दान करून महेंद्र पर्वतांवर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले.