मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

Akshaya Tritiya 2019 : या चुकांमुळे रुसू शकते लक्ष्मी

अक्षय तृतीया काही विशेष कार्यांसाठी शुभ काही कार्यासाठी अशुभ फल प्रदान करणारी तिथी आहे. म्हणून काही कार्य विशेष करून या दिवशी करणे टाळावे.
 
अक्षय तृतीयेला काय करावे
 
अक्षय तृतीया तिथी व्यवसाय प्रारंभ, गृहप्रवेश, वैवाहिक कार्य, सकाम अनुष्ठान, जप-तप, पूजा-पाठ इतर कार्यांसाठी शुभ मानली गेली आहे. या दिवशी दान केल्याने पुण्य अक्षय राहतं अर्थात पुण्य नष्ट होत नाही.
 
अक्षय तृतीयेला पिंपळ, आंबा, लघुपिंपरी, गूलर, वड, आवळा, बेल, जांभूळ आणि इतर फळ प्रदान करणारे वृक्ष लावल्याने व्यक्ती सर्व कष्टांपासून मुक्त होऊन ऐश्वर्य प्राप्त करतो. ज्या प्रकारे 'अक्षय तृतीया' ला लावलेले वृक्ष हिरवे होऊन पल्लवित- पुष्पित होतात त्याच प्रकारे या दिवशी वृक्षारोपण केल्याने प्राणी देखील प्रगतीच्या मार्गावर पुढे वाढतो.
 
अक्षय तृतीयेला काय करणे टाळा
 
ज्या प्रकारे या दिवशी पुण्य कार्यांचे क्षय होत नाही, त्याचे फळ निश्चित प्राप्त होतं त्याच प्रकारे या दिवशी अत्याचार, चुकीचे वागणे, व इतर पाप कर्मांचे फळ देखील अचूक राहतात. या दिवशी घडलेले पाप अनेक जन्मांपर्यंत पिच्छा सोडत नाही. अशात शास्त्रांमध्ये या दिवशी वागणुकीत अत्यंत सावधगिरी बाळगळण्याची आवश्यकता असते.
 
या दिवशी असामाजिक कार्य केल्यास देवी लक्ष्मी रुसून बसते आणि सतत धनाचा अभाव झेलावा लागू शकतो.
 
या तिथीचे महत्त्व सांगत देवी पार्वती म्हणते की जर एखादी स्त्री सर्व प्रकारे सुख भोगू इच्छित असेल तर तिने या दिवशी व्रत करावे आणि कोणत्याही प्रकाराचा मीठ सेवन करू नये. महाराज दक्ष यांची पुत्री रोहिणीने हेच व्रत केले आणि आपल्या पती चंद्राची सर्वात प्रिय बनून राहिली. तिने मीठ सेवन न करता व्रत केले होते.

अक्षय तृतीयेला अंघोळ न करता तुळशीला हात लावू नये. तुळशीचे पान तसे देखील अंघोळ केल्याशिवाय तोडू नये. याने देवी लक्ष्मी नाराज होते.
 
अक्षय तृतीयेला पूजा करण्यापूर्वी पूजास्थळी अस्वच्छता आपल्यासाठी अशुभ ठरू शकते. या दिवशी लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी जागा स्वच्छ आणि शुद्ध असावी हे सुनिश्चित करावे. स्वत: देखील स्वच्छ कपडे धारण करावे.
 
आपले कोणते ही व्रत सुरू असल्यास त्याचे उद्यापन अक्षय तृतीयाच्या दिवशी येत असल्यास उपास सोडू नये.
 
तसेच या मंगळ दिवशी गृह प्रवेश किंवा घर खरेदी करू शकता परंतू कोणत्याही प्रकाराचे निर्माण कार्य करू नये. असे करणे अशुभ मानले गेले आहे. 
 
देवी पार्वतीने सांगितली व्रत महिमा
 
स्वयं देवी पार्वतीने धर्मराज यांना समजवत सांगितले की हेच व्रत केल्याने मी महादेवासह आनंदित राहते. अशात कुमारिकांनी योग्य पतीची प्राप्तीसाठी हे व्रत पूर्ण श्रद्धा-भाव सह केले पाहिजे. संतान प्राप्ती इच्छुक महिलांनी हे व्रत करून या सुखाची प्राप्ती करावी. देवी इंद्राणीने हे व्रत करून जयंत नामक पुत्र प्राप्त केले होते. या व्रतामुळेच देवी अरुंधतीने आपल्या पती महर्षी वशिष्ठ यांसह आकाशात सर्वात उच्च स्थान प्राप्त केले होते.
 
या प्रकारे करा पूजन
 
अक्षय पुण्य प्रदान करणारी तृतीया या तिथीला जगतगुरु भगवन् नारायण यांची देवी लक्ष्मी सह गंध, चंदन, अक्षता, पुष्प, धूप, दीप नैवेद्य दाखवून पूजा करावी. या पवित्र दिवशी प्रभू विष्णूंना गंगा जल आणि अक्षतांनी स्नान करवावे. याने मनुष्याला राजसूय यज्ञाच्या फळाची प्राप्ती होते आणि प्राणी सर्व पापांपासून मुक्त होऊन जातात.