शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

Akshaya Tritiya 2019: दारिद्र्य दूर करण्यासाठी केवळ एक मंत्र

भविष्य पुराणानुसार अक्षय तृतीयेला केले जाणारे कर्म अक्षय होऊन जातात. या दिवशी जप-तप, दान-पुण्य इतर कर्मांचे फळ अक्षय आणि अनंत असतात. सुख प्राप्तीची इच्छा असणार्‍यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अक्षय तृतीयेला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करता येईल.
 
लक्ष्मी यं‍त्र किंवा श्रीयंत्राला अक्षतांच्या ढिगावर स्थापित करून उत्तराभिमुख होऊन कमळ गट्ट्याची माळ, गुलाबी आसन आणि खिरीचे नैवेद्य व गुलाबाचे अत्तर, कमळ किंवा गुलाबाच्या फुलाने पूजन करून निम्न मंत्राचा यथाशक्ति जप करावा. नंतर यंत्र सोडून इतर सर्व सामुग्रीची पोटली तयार करून रोख पेटीत किंवा तिजोरीत ठेवावी.
 
लक्ष्मी यं‍त्र किंवा श्रीयंत्राला अक्षतांच्या ढिगावर स्थापित करून उत्तराभिमुख होऊन गुलाबी आसनावर बसावे. गुलाबाचे अत्तर, कमळ किंवा गुलाबाच्या फुलाने पूजन करून खिरीचे नैवेद्य दाखवावे. कमल गट्ट्याची माळ घेउन निम्न मंत्राचा यथाशक्ति जप करावा. नंतर यंत्र सोडून इतर सर्व सामुग्रीची पोटली तयार करून रोख पेटीत किंवा तिजोरीत ठेवावी.
 
 
मंत्र- 'ॐ श्री श्रियै नम:।।'
 
किंवा
 
'ॐ कमल वासिन्यै श्री श्रियै नम:।।'
 
किंवा
 
'ॐ श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद-प्रसीद श्री श्रियै नम:।।'