शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

अक्षय तृतीयेला घरातील स्त्रीने करावे हे 10 सोपे उपाय, भरभराटी येईल

अक्षय तृतीयेला अनेक शुभ उपाय केले जातात. अशात आम्ही आपल्याला केवळ 10 असे उपाय सांगत आहोत ज्या घरातील स्त्रीने आपल्या सुविधा आणि सामर्थ्याप्रमाणे केल्याने घरात अपार सुख, सौभाग्य, धन संपत्तीचे आगमन होतं.
 
1. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामुग्री अर्पित करावी.
 
2. अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ 11 गोमती चक्र ठेवावे.
 
3. देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा. 
 
4. दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध, दही अर्पित करावे.
 
5. गरिबांना पात्र, अन्न, धन, वस्त्र इतर दान करावे.
 
6. देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे.
 
7. देवी लक्ष्मीचे श्री यंत्र घरात आणावे.
 
8. चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे.
 
9. लाखेच्या लाल, पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्या.
 
10. चांदी जोडवी पूजेत ठेवून नंतर नणंद किंवा भावजयला भेट द्यावी.