सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 29 एप्रिल 2019 (00:12 IST)

Akshay Tritiya 2019: या दिवशी आहे अक्षय तृतीया, त्याचे महत्त्व जाणून घ्या

पंचांगानुसार अक्षय तृतीया फारच शुभ दिवस असतो. विवाह इत्यादी साठी या दिवशी पंचांग बघण्याची गरज नसते. या दिवशी सोने विकत घेणे फारच शुभ मानले जाते. 
 
अक्षय तृतीयेचा सण या वर्षी सात मे (मंगळवार) रोजी आहे. अक्षय तृतीयाचा अर्थ असतो अशी तिथी जिचा कधी क्षय होत नाही अर्थात न संपणारे.  वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला फार सौभाग्यशाली समजले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन वास्तूंची खरेदी फारच शुभ मानली जाते खास करून सोन्याचे दागिने.
 
अक्षय तृतीयेचे वेगळेच महत्त्व आहे. ह्या दिवसाला परशुराम जयंतीच्या रूपात देखील साजरे केले जाते. या दिवसापासून त्रेता युगाचा आरंभ देखील होतो असे मानले जाते. 15 वर्षांनंतर अक्षय तृतीयेला सूर्य, शुक्र, चंद्र आणि राहू आपली उच्च राशीत प्रवेश करतील. या दिवशी विना मुहूर्ताचे लग्न करू शकता.
 
पितरांच्या शांतीसाठी अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की त्रेता युगाचा आरंभ अक्षया तृतीयेच्या दिवसापासूनच झाला आहे. सुदामाने कृष्णाकडून तांदूळ अक्षय तृतीयेच्या दिवशीच मिळवले होते.