गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

चैत्रगौरी पूजन

चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गौरी ही माहेरी येते अशी समजूत आहे. विषम संख्यांच्या पायर्‍यांवर देवीची आरास मांडण्यात येते. गौरीचा पाळणा बसवून त्याभोवती सोयीप्रमाणे विविध फळं, फराळ, गोड पदार्थ आणि खिरापतीचा (सुके खोबरे आणि साखर) नैवेघ दाखवला जातो. हौसेप्रमाणे देवीच्याभोवती सुवासिक फुलांची किंवा आर्कषक झाडांची कुंडी मांडली जाते.

गौरीचे अक्षयतृतीयेपर्यंत पूजा करतात व त्याच दिवशी सांगता करतात. या चैत्रगौरीचा उत्सव सोयीप्रमाणे महिन्याभराच्या काळात गौरीचे रूप समजून किमान एका सुवासिनीची ओटी भरून तिला जेवायला घालण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी हळदी- कुंकु समारंभ करून सुवासिनींना बोलावतात व त्यांना कैरीची डाळ, पन्हे व खिरापत देऊन त्यांची हरभर्‍यांनी ओटी भरली जाते.