सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 मे 2019 (11:41 IST)

अक्षय तृतीया साठी खरेदी करा, स्वस्त झाले सोने, हे आहेत भाव

अक्षय्य तृतीया काही दिवसांत येणार आहे. त्यात चांगली गोष्ट अशी की  सर्वाना हवे असलेल्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सणाच्या काही दिवस आधी सोनं स्वस्त झाल्यामुळे अनेकजण खेरदीची तयारी केली आहे. मागील काही महिन्यापासून सोनं ५.७६ टक्के स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता सोने खरेदीचा हाच चांगला दिवस असू  ज्यांना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचे आहे त्यांच्या साठी फार उत्तम संधी आहे.
 
भारत सरकार प्रत्येक १५ दिवसानंतर सोन्याचे भाव ठरवते. लग्नसराईमध्ये वर्षाच्या सुरूवातीला सोन्याचा भाव ३५ हजारांवर गेला होता. मात्र, फेब्रुवारीच्या अखेरीस ३४ हजार रुपये प्रति तोळा झाला. तर मार्च-एप्रिलमध्ये सोन्याची किंमत आणखी कमी झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोनं ३३ हजारांवर आलं. ९ मार्च रोजी ३२ हजार ८०० रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा भाव आणखी कमी होऊन ३२ हजार ३०० रूपये प्रतितोळा झाला. मे महिन्याच्या सुरूवातीला सोनं दोन टक्क्यानं स्वस्त होऊन प्रतितोळा ३१ हजार ५०० रूपये झाले. आता सोनं आणखी एक टक्क्याने स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही मुहूर्त बघत होता तोच हाच असून या अक्षय तृतीयेला सोन खरेदी नक्की करा कारण जर बाजारत परत उठाव झाला तर पुन्हा सोने महाग होण्याची शक्यता आहे.