शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तुळशीचा एक उपाय श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळून देईल

तुळशीला किती महत्तव आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. दररोज तुळशीच्या झाडाला जल अर्पित करुन पूजन केल्याने, तुळशीसमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरात सुख-समृद्धी नांदते. आर्थिक स्थिती चांगली राहते. तुळस आरोग्यासाठी तर उत्तम आहेच तसेच तुळशीमुळे घरात भरभराटी येते हे जर आपल्याला माहित नसेल तर जाणून घ्या सोपा उपाय ज्यामुळे आपण नोकरीत असाल वा व्यवसायात आपल्याला यश नक्की मिळेल.
 
सर्वात आधी तर पूजनाबद्दल सांगायचे तर तुळशीचे आठ नावे सांगण्यात आले आहे ज्याचा जप करणे अत्यंत फलदायी ठरतं.
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी।। 
तुळशीचे हे आठ जपल्याने अक्षय फळ प्राप्ती होते.
 
तसेच सकाळी स्वत: अंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घातल्याने सर्व प्रकाराचे संकट दूर होतात. समस्या सुटतात, भौतिक सुखाची प्राप्ती होते. नोकरी आणि व्यवसायसंबंधी काही अडचणी असल्यास त्या देखील दूर होतात. 
तसेच दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. दिवा लावून तुळशीचा प्रदक्षिणा घालावी. दररोज शक्य नसल्यास किमान एकादशीला हे नियमान करावे. याने कुटुंबातील प्रेम टिकून राहतं आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
 
तुळस किती पवित्र आहे हे तर आपल्याला माहितच असेल. याने जल, अन्न, स्थळ सर्व शुद्ध होतात. ग्रहणात पाणी, धान्यात, दुधात तुळशीचे पान घालून ठेवल्याने त्यावर ग्रहणाचा प्रभाव पडत नसतो असे मानले गेले आहे. म्हणूनच विष्णूंना नैवेद्य दाखवताना वर तुळशीचे पान ठेवावे.
 
तसेच धर्म शास्त्रानुसार मृत्यूनंतर देखील मृतकाच्या मुखात तुळशीचे पान ठेवल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते.
 
आता उपायाबद्दल बोलू या...
खूप प्रयत्न करुन देखील व्यवसाया‍त किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे. आपण हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवसाला करु शकता. या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ असलेली गवत घेऊन पिवळ्या रंगाच्या कापड्यात बांधायची आहे आणि हे आपल्या तिजोरी, लॉकर, व्यवसायातील गल्ला किंवा किमती दागिने, वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायची आहे. याने निश्चितच प्रगती होईल. 
 
आपल्याला संतानकडून सुख मिळत नसेल किंवा आपल्या सांगण्यात नसेल तर रविवारीला तुळस तोडू नये म्हणून इतर दिवशी तुळशीचे तीन पाने तोडून संतानला खाऊ घालत्यास संतान आपल्या सांगण्यात राहील. तसेच तुळशी पूजन करताना आपल्या सवाष्ण दिसल्यास तिला लक्ष्मी स्वरुप मानून तुळशीचे वाहिलेले कुंकु लावावे आणि तेच कुंकु आपल्या संतानाला देखील लावावे. याने त्याची वागणूक चांगली होईल, वाईट संगत असल्यास दूर होईल. 
 
आता महत्तवाची गोष्ट म्हणजे तुळशीचं झाडं पूर्व दिशेकडे असावं. असं करणं शक्य नसल्यास उपाय करण्याच्या दोन दिवसापूर्वीत तरी झाडाची दिश परिवर्तित करुन द्यावी.
 
तसेच ज्या कन्येचा विवाहाचा योग येत नसेल, तिने दक्षिण पूर्व दिशेत तुळशीचं झाडं ठेवून पूजन करावे. विवाहाचे योग जुळून येतील