शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

Akshaya Tritiya Pooja Vidhi : याहून सोपी पद्धत मिळणार नाही

अक्षय तृतीयेला कशा प्रकारे पूजा करून या शुभ दिवसाची संधी साधावी हे आम्ही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहोत.
 
* अक्षय तृतीयेला अर्थात या व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त उठावे. पहाटे लवकरात लवकर बिछाना सोडावा.
 
* घराची सफाई व नित्य कर्म याहून निवृत्त होऊन पवित्र किंवा शुद्ध पाण्याने अंघोळ करावी.
 
* घरात पवित्र स्थानावर प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
 
* नंतर मंत्र म्हणत संकल्प घ्यावा-
 
ममाखिल पाप क्षय पूर्वक सकल शुभ फल प्राप्तये
भगवत्प्रीति कामनया देवत्रय पूजन महं करिष्ये।
* संकल्प घेऊन प्रभू विष्णूंना पंचामृताने अंघोळ घालावी.
 
* षोडशोपचार विधीने प्रभू विष्णूंची पूजा करावी.
 
* प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळ अर्पित करावी.
 
* नैवेद्यात जव किंवा गव्हाचा सातू, काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करावी.
 
* विष्णू सहस्रनामाचा जप करावा.
 
* सर्वात शेवटी तुळशीचा जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी.
 
* या दिवशी उपास करावा.
 
* मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचे दान द्यावे.
 
या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्म यज्ञ, पिंड दान आणि अन्न दान करावे. या दिवशी पाण्याच मटके दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू,सातू, तांदूळ, मातीचे मडके,फळ दान करणे शुभ ठरेल. दान व्यतिरिक्त या दिवशी स्वत:साठी खरेदी करुन त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं. म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदादसंबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रीअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृह प्रवेश, तसेच मंगळ कार्य करणे शुभ समजात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे. दान-पुण्य करावे कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात. म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे.