शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By अनिरुद्ध जोशी|
Last Updated : शनिवार, 18 एप्रिल 2020 (13:28 IST)

अर्जुनाच्या 4 बायकांपैकी एक चित्रांगदाच्या मनोरंजक गोष्टी....

द्रौपदीशिवाय अर्जुनाला सुभद्रा, उलूपी आणि चित्रांगदा अश्या तीन बायका होत्या. सुभद्राच्या पोटी अभिमन्यूने, उलूपीच्या पोटी इरावत आणि चित्रांगदाच्या पोटी बभ्रुवाहन या वीर पुत्रांनी जन्म घेतले. आज आपण अर्जुनाच्या बायकांमधली चित्रांगदाच्या विषयी जाणून घेऊ या..
 
1 चित्रांगदा अर्जूनाची पत्नी अशी झाली - वनवासाच्या काळात कुंतीचा मुलगा अर्जून एकदा महेंद्र पर्वतावरून समुद्राच्या कथेवरून चालत चालत मणीपूर राज्यात पोहोचतो. तिथे राजा चित्रसेनची कन्या चित्रांगदाला बघून तिच्या सौंदर्यतेवर मोहित होऊन राजा चित्रसेनाचा सामोरी चित्रांगदाशी लग्न करण्याची इच्छा सांगून स्वतः बद्दल सांगतो की हे राजन मी कुळांनी क्षत्रिय असून आपण आपल्या मुलीसोबत माझं लग्न लावून द्या. चित्रवाहनने नाव विचारल्यावर मी पांडुपुत्र असल्याचं अर्जून सांगतो. 
 
2 राजा चित्रवाहनाने एक अट घातली - राजा चित्रवाहनाने आपल्या मुलीचे लग्न अर्जूनाशी लावून देण्यासाठीची एक अट घातली. अट अशी होती की त्यांचा मुलगा (अर्जून आणि चित्रांगदाच्या) चित्रवाहन कडेच राहील. त्यामागील कारण असे की पूर्वकाळी चित्रवाहनाच्या पूर्वजांमधील प्रभंजन नावाचे राजा असे. त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. महादेवाने त्यांना पुत्र प्राप्तीचा वर देऊन सांगितले की राजन आपल्या प्रत्येक पिढी मध्ये फक्त एकच अपत्य जन्म घेईल. चित्रांगदा तीच कन्यारत्न होती. राजा अर्जुनाला म्हणाला की मला एकच मुलगी आहे. मी तिला मुलाप्रमाणेच वाढवले आहे. मी तिला आपला मुलगाच मानतो. आपले लग्न मी मुलीशी केल्यानुसार करेन म्हणजे या लग्नापासून जे मुलं होईल तो माझा वंश वाढविण्याचे काम करेल. अर्जूनाने होकार देत म्हटले की महाराज, मी आपली परिस्थिती जाणतो, मला आपली अट मान्य आहे. अश्या प्रकारे अर्जून आणि चित्रांगदेचे लग्न झाले.
 
3 चित्रांगदाचा मुलगा  - काही काळांतरानंतर चित्रांगदा आणि अर्जुनाला एका पुत्र रत्नाची प्राप्ती होते. त्याचे नाव बभ्रुवाहन ठेवण्यात येतं. पुत्र जन्माच्या नंतर मुलाची सगळी जबाबदारी चित्रांगदेवर सोडून अर्जून चित्रांगदेला म्हणतात की चित्रांगदा आपल्या वडिलांच्या सोबतीने काही काळानंतर महाराज युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार आहे त्यासाठी तू इंद्रप्रस्थाला ये. तिथे तुला सगळ्या नातेवाइकांना भेटता येईल. 
 
4 चित्रांगदाचा शोक - एकदा महाराज युधिष्ठिराने अश्वमेघ यज्ञ केले होते. त्यावेळी त्या यज्ञाचा अश्व मणीपूर मध्ये जाऊन पोहोचतो. त्या अश्वाच्या सोबती अर्जून पण पोहोचतात. बभ्रुवाहन त्यांचे स्वागत करतो. तेव्हा अर्जुनाला राग येतो. ह्याला ते त्याला क्षत्रिय म्हणून मान्य करत नाही आणि बभ्रुवाहनाला लढण्याचे आव्हान देतो. प्रत्युत्तरात बभ्रुवाहन अर्जुनाचा वध करतो. 
 
अर्जुनाच्या मृत्यूची बातमी ऐकतातच अर्जूनाची बायको रणांगणात पोहोचते आणि शोक करावयास सुरुवात करते. ती उलूपीला म्हणते की तुझं म्हणणे ऐकून माझ्या मुलाने आपल्या पित्यासोबत युद्ध केले. तू धर्माचे ज्ञान ठेवतेस, माझ्या अर्जुनाला अभय दे. चित्रांगदा उलूपीला फार कठोर बोलते आणि सभ्यपणाने विनवणी पण करते आणि म्हणते की तूच माझ्या मुलं आणि पित्याचे भांडण लावून त्यांचे प्राण घेतले आहे तू आताच अर्जुनाला जिवंत कर नाही तर मी पण माझा जीव देईन. तेवढ्यात बभ्रुवाहनाला शुद्ध येते शुद्धीवर आल्यावर तो बघतो की माझी आई अर्जुनाच्या जवळ शोक करीत आहे आणि जवळच सावत्र आई उलूपी पण आहे. हे बघून बभ्रुवाहन पण शोक करायला लागतो आणि प्रतिज्ञा घेतो की मी आपले देहत्याग पण ह्याच रणभूमीमध्ये करेन. 
 
आई आणि मुलाला शोकवंत बघून उलूपीचे काळीज पाझरते आणि तिला आठवते संजीवनी मणी. त्या मणीचे स्मरण करताच ती नागांची मणीरत्न बभ्रुवाहनला देऊन म्हटते की उठ, असा शोक करू नकोस. तू तुझ्या पित्याला मारले नाही. ते तर संपूर्ण मानवजातीसाठी अजिंक्य आहेत. हे घे दिव्यरत्न आपल्या स्पर्शाने सापाला देखील जिवंत करण्याचे सामर्थ्य ह्या रत्नामध्ये आहे. हे तुझ्या पिताच्या छातीवर लाव. ह्या रत्नाचा स्पर्श होताच ते जिवंत होतील. बभ्रुवाहनने तसेच केले. थोड्याच वेळात अर्जून जिवंत झाला. बभ्रु वाहनाने अश्वमेघ यज्ञाचे अश्व अर्जुनाला परत केले आणि आपल्या दोन्ही आईंना चित्रांगदा आणि उलूपी ला घेऊन युधिष्ठिराने केलेल्या यज्ञात उपस्थिती लावली.  
संदर्भ : महाभारत आदिपर्व, आश्वमेधिक पर्व