शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (15:44 IST)

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. या मालिकांमध्ये ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘देख भाई देख’, ‘सर्कस’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकांचा समावेश आहे. आता इतर चॅनेलवर देखील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात झाली आहे. या मालिकांमध्ये दोन नव्या कॉमेडी मालिकांचा समावेश झाला आहे.
 
‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार भारत वाहिनीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ‘तब्बल १६ वर्षांनंतर इंद्रवदन तुमच्या भेटीस येणार आहे. ६ एप्रिल पासून साराभाई वर्सेस साराभाई दररोज सकाळी १० वाजता स्टार भारत वाहिनीवर’ असे ट्विट केले आहे.
 
तर त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये ‘खिचडी’ ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. ‘१८ वर्षांनंतर पुन्हा प्रफुल तुमच्या भेटीस येत आहे. ६ एप्रिल पासून सकाळी ११ वाजता पाहा खिचडी मालिका फक्त स्टार भारत वाहिनीवर’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.