शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (17:26 IST)

श्रीरामापेक्षा राम या नावाचं अधिक महत्त्व, जाणून घ्या यामागील गूढ

होइहै वही जो राम रचि राखा।
को करे तरफ बढ़ाए साखा।।
'राम' केवळ एक नाव नव्हे, केवळ एक मानव नव्हे. राम परम शक्ती आहे. प्रभू श्रीरामाला विद्रोह करणार्‍यांना बहुतेकच माहीत असेल की ते स्वत:भोवती नरकाचा निर्माण करत आहे. म्हणून ही काळजी करू नका की कोण प्रभू श्रीरामाचं अपमान करतं आणि कोण त्यांचं अनुसरणं. कोण हे नावं जपतं आणि कोण नाही. 
 
1. रामाहून त्यांचं नाव अधिक प्रभावी
असे म्हणतात की प्रभू श्रीरामांचे नाव त्यांच्याहून अधिक महान आहे. राम राम जप केल्याने अनेक लोकांना मोक्ष प्राप्ती झाली आहे. राम एक महामंत्र आहे ज्याचा जप केवळ हनुमानच नव्हे तर महादेव देखील करतात. रामाच्या आधीदेखील राम नाम होतं. प्राचीन काळात राम ईश्वरासाठी संबोधित केलं जात होतं. 
 
2. राम वा मार 
राम या शब्दाचं विपरित म, अ, र अर्थात मार. मार बौद्ध धर्माचा शब्द आहे. मार याचा अर्थ आहे- इंद्रियांच्या सुखातच रत राहणारा आणि दुसरं वादळ. रामाला सोडून जी व्यक्ती इतर विषयांमध्ये रमते, मार त्यांना तेथेच पाडतं. ज्या प्रकारे वाळलेल्या वृक्षांना गडगडाटी वादळ.
 
3. राम नावाचा अर्थ
1. एकदा राम संबोधित केल्याने देखील आपले सर्व दुख नाहीसे होतात. आपले सर्व दुख दूर करण्यासाठी एकमेव संबोधन आहे- 'हे राम'
2. दोन वेळा राम संबोधन केल्यास अभिवादन करणे आहे. जसे- राम राम.
3. तीन वेळा राम संबोधन करणे म्हणजे संवेदना. जसे 'हे काय झाले राम राम राम'
4. चार वेळा राम म्हटलं तर भजन होईल. 
 
4. तारणहार राम नाव 
रामाचं नाव जपणारे अनेक संत आणि कवी होऊन गेले. जसे कबीरदास, तुलसीदास, रामानंद, नाभादास, स्वामी अग्रदास, प्राणचंद चौहान, केशवदास, रैदास किंवा रविदास, दादूदयाल, सुंदरदास, मलूकदास, समर्थ रामदास इतर. श्रीराम-श्रीराम जप करत असंख्य साधू-संत मुक्तीला प्राप्त झाले.
 
5. जीवन रक्षक नाव
प्रभू श्रीरामच्या नावाच्या उच्चारणाने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ध्वनी विज्ञानाशी परिचित लोकं जाणतात की 'राम' शब्दाची महिमा अपरंपार आहे. जेव्हा आम्ही 'राम' म्हणतो तेव्हा वारा किंवा वाळूवर एक विशेष आकृती निर्मित होते. त्याच प्रकारे चित्तमध्ये देखील विशेष लय येते. जेव्हा व्यक्ती सतत 'राम' जप करते तेव्हा रोम-रोम मध्ये प्रभू श्रीराम वास करतात. भोवती सुरक्षा मंडल निर्मित होतं. प्रभू श्रीरामाच्या नावाचा प्रभाव अतिशय सकारात्मक आहे. 
 
हरि अनंत हरि कथा अनंता। कहहिं सुनहिं बहुबिधि सब संता॥
रामचंद्र के चरित सुहाए। कलप कोटि लगि जाहिं न गाए॥
 
भावार्थ-
हरी अनंत आहे आणि त्यांची कथा देखील अनंत आहे. सर्व संत विविधरीत्या त्यांचे वर्णन करतात. रामचंद्राचे सुंदर चरित्र कोटी कोटी कल्पनेत देखील गायले जाऊ शकत नाही.