शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अयोध्या , शुक्रवार, 24 जुलै 2020 (16:33 IST)

राममंदिर भूमिपूजनासाठी ही अशुभ वेळ : शंकराचार्य

अयोध्येत मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झालेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी होणार्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळेविषयी शंकरार्चा स्वरूपानंद सरस्वती यांनी शंका उपस्थित केली आहे.
 
भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आलेली वेळ अशुभ असल्याचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राममंदिराच्या कामाला अखेर सुरूवात झाली आहे. अयोध्येत सध्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असून पुढील महिन्यात 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.
 
भूमिपूजनाचा सर्व कार्यक्रम निश्चित झालेला असताना शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी आपले मत मांडले आहे. आम्हाला कोणतेही पद नको किंवा राममंदिराचे विश्वस्तही व्हायचे नाही. आमची इतकीच इच्छा आहे की, मंदिराचे काम व्यवस्थित व्हायला हवे आणि योग्यवेळी पायाभरणी करायला हवी पण सध्याची ही‍ वेळ अशुभ वेळ आहे, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचे मंदिर जनतेच्या पैशातून उभारले जाणार आहे, तर मंदिराच्या बांधकामासंदर्भात लोकांचीही मते जाणून घ्यायला हवीत, असे त्यांनी म्हटले आहे. 
 
पायाभरणीचा कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती राममंदिर उभारण्याची जबाबदारी असणार्याव राममंदिर ट्रस्टने दिली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान 150 निमंत्रितांसह एकूण 200 जणे उपस्थित राहणार आहेत.