रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : बुधवार, 29 जानेवारी 2020 (15:45 IST)

वसंत पंचमी: सरस्वती पूजा मंत्र

वसंत पंचमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर एखाद्या शांत जागेवर किंवा मंदिरात पूर्व दिशेकडे मुख करून बसावे. आपल्यासमोर लाकडाचे चौरंग ठेवावे. त्यावर पांढरा कपडा घालावा आणि त्यावर देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावी. चौरंगावरच एका तांब्याच्या ताम्हणात किंवा ताटलीत अक्षता ठेवून प्राण-प्रतिष्ठित व चेतनायुक्त शुभ मुहूर्तात सिद्ध केलेलं 'सरस्वती यंत्र' स्थापित करावं.
 
गणपतीची पूजा करून नंतर सरस्वतीची पूजा करावी. पंचामृताने स्नान करवावे. यंत्र आणि चित्रावर केशर किंवा कुंकू वाहावे. पिवळे फुलं, फलं अर्पित करावे. नंतर दुधाने तयार पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
 
यानंतर सरस्वती कवच पाठ करावे. देवी सरस्वतीची पूजा करताना या मंत्राचा जप केल्याने असमी पुण्य प्राप्ती होते-
'श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा'।
 
मां सरस्‍वती का श्‍लोक-
 
देवी सरस्वतीची आराधना करताना हा श्‍लोक उच्चारित केला पाहिजे-
 
ॐ श्री सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्।।
कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्।
वह्निशुद्धां शुकाधानां वीणापुस्तकमधारिणीम्।।
 
पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या व आपल्या मुलांसाठी ऋद्धी-सिद्धी, विद्यार्जन, तीव्र स्मरण शक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी.