रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

वसंत पंचमीला मुलांच्या बौद्धिक विकासासाठी हा उपाय...देवी सरस्वतीचा आ‍शीर्वाद मिळेल

वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवून घेतल्याने ते हुशार होतात. त्यांचा बौद्धिक विकास होतो असे मानले गेले आहे. तसेच वसंत पंचमीला लहान मुलास प्रथम अन्नप्राशन करावयाचा विधी अर्थात उष्टावण करण्याची परंपरा आहे. 
 
या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून, चौरंगावर लाल कापड त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने खीर खाऊ घालावी. मुलांच्या जिभेवर ऐं, श्री किंवा ॐ असे लिहावे. वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवल्याने मुले हुशार होतात.
 
या दिवशी आई-वडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाचा काडीच्या मदतीने मधाने मुलांच्या जिभेवर ऐं, श्री किंवा ॐ असे लिहावे. यानंतर सरस्वती पूजन करावे. तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने या तीन मधून कोणतेही एक अक्षर लिहावे.
 
काळ्या रंगाच्या पाटी व पेम यांचे देखील पूजन करावे. या दिवशी सरस्वती स्वरूपा पेन आणि पुस्तकाचे देखील पूजन करावे.
 
सरस्वती मूल मंत्र श्री ह्रीं सरस्वत्यै स्वाहा याने देवीची आराधना करावी. उच्च शिक्षणात यश मिळवण्याचे इच्छुक असणार्‍यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करवावे.