गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

वसंत पंचमीला काय टाळावे जाणून घ्या

वसंत पंचमी सण या वर्षी 10 फेब्रवारीला साजरा करण्यात येईल. या दिवशी विद्यार्थी, कलाकार, संगीतकार आणि लेखक तसेच इतर भक्त देवी सरस्वतीची उपासना करतात. स्वरसाधक देवी सरस्वतीची आराधना करत सुंदर स्वर प्रदान करण्याची प्रार्थना करतात.
 
वसंत पंचमीला चुकून करु नये या 5 चुका-
 
1- वसंत पंचमीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करु नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे सर्वोत्तम ठरेल.
 
2- वसंत पंचमीला अंघोळ केल्याशिवाय अन्न ग्रहण करु नये. या दिवशी शक्य असल्यास नदी, तलावात जाऊन अंघोळ करावी आणि देवीची आराधना केल्यावरच आहार ग्रहण करावा.
 
3- वसंत पंचमीच्या दिवशी मास-मदिराचे सेवन करणे टाळावे. या दिवशी पूजा केल्यानंतर सात्विक भोजन ग्रहण करावे. 
 
4- वसंत पंचमीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये, भांडू नये किंवा क्रोध करु नये. या दिवशी कोणासाठी वाईट भाष्य करु नये कारण या दिवशी जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान असते. स्वत:साठी देखील 
 
वाईट बोलू नये. या दिवस कलह देखील करु नये. याने पितरांना कष्ट होतो असे मानले जाते.
 
5- हा सण निसार्गाशी जुळलेला आहे. म्हणून या दिवशी धान्य तसेच वृक्ष कापू नये. पिकाची कापणी करु नये. झाडांनी छाटणी करणे देखील टाळावे.