श्रीकृष्णाने कर्णाचे अंतिम संस्कार आपल्या हातात का केले?
जेव्हा कर्ण मृत्युशैयेवर होता तेव्हा कृष्ण त्याच्याजवळ त्याचे दानवीर होण्याची परीक्षा घेण्यासाठी आले. कर्णाने कृष्णाला सांगितले की माझ्याजवळ देण्यासाठी काहीच नाही आहे. अशात कृष्णाने त्याचा सोन्याचा दात त्याला मागितला.
कर्णाने आपल्या जवळ पडलेला दगड उचलला आणि त्याने आपले दात तोडून कृष्णाला दिले. कर्णाने एकदा परत आपले दानविर होण्याचे प्रमाण दिले ज्यामुळे कृष्ण फारच प्रभावीत झाले. कृष्णाने कर्णाला सांगितले की तो कुठलेही वरदान मागू शकतो.
कर्णाने कृष्णाला सांगितले की मी एक निर्धन सूत पुत्र असल्यामुळे माझ्यासोबत फार छळ झाले आहे. पुढच्या वेळेस कृष्ण जेव्हा पृथ्वीवर जन्म येईल तेव्हा त्याने मागासलेल्या लोकांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करावा. त्याच बरोबर कर्णाने दोन अजून वरदान मागितले.
दुसर्या वरदानात कर्णाने मागितले ती पुढच्या जन्मी कृष्णाने त्याच्याच राज्यात जन्म घ्यावा आणि तिसर्या वरदानात त्याने कृष्णाला सांगितले की त्याचा अंतिम संस्कार अशा जागेवर व्हायला पाहिजे जेथे कुठलेच पाप नसावे.
संपूर्ण पृथ्वीवर अशी कोणतीच जागा नसल्याने कृष्णाने कर्णाचे अंतिम संस्कार आपल्या हातात केले. या प्रकारे दानवीर कर्ण मृत्यूपश्चात साक्षात वैकुण्ठ धामाला प्राप्त झाला