रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 18 जुलै 2022 (10:23 IST)

'तिथे' आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग

kotilingeshwar
एकच परमतत्त्व अनेक नाम-रूपांनी नटलेले आहे, अशी वेदांची शिकवण आहे. श्रावण महिन्यात विशेषतः शिवोपासनेला अधिक महत्त्व आहे. देशात सर्वत्र शिवशंकराची अनेक मंदिरे आढळतात. कर्नाटकात एक ठिकाण असे आहे जिथे दोन-तीन नव्हे तर तब्बल एक कोटी शिवलिंग पाहायला मिळतात. कर्नाटकच्या कोलार येथील कोटीलिंगेश्वर मंदिरात ही शिवलिंग आहेत. अहिल्येचे पती गौतम ऋषींच्या शापानंतर इंद्राने शापमुक्तीसाठी इथे शिवलिंगाची स्थापना केली होती, असे सांगितले जाते. इंद्राने येथील शिवलिंगावर दहा लाख नद्यांच्या पाण्याने अभिषेक केल्याचीही कथा सांगितली जाते. येथील सर्वात मोठ्या शिवलिंगाची उंची 108 फूट आहे. अनेक लोक आपल्या प्रार्थनेला फळ आल्यावर याठिकाणी नवे शिवलिंग स्थापित करीत असल्याने तिथे इतकी शिवलिंग दिसतात.