रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कर्णाला मारणे आवश्यक आहे... असं का म्हणाला कृष्ण?

हे तर सर्वांना माहीत आहे की महाभारताच्या युद्धात कायदा मोडून कृष्णाने अर्जुनाला कर्णाचा वध करायला भाग पाडले होते. ज्यामागे एकच उद्देश्य होता तो म्हणजे धर्माची रक्षा.
 
कर्ण हा सूर्यपुत्र आणि एक असा महान योद्धा होता ज्याकडे स्वत:च्या रक्षेसाठी कवच आणि कुंडल होते. त्याला पराजित करणे अजुर्नालाही अशक्यच होते परंतू हे सर्व कसे आणि का घडले जाणून घ्या:
 
ध्येय महत्त्वाचे आहे
भगवद् गीतेत कृष्णाने स्पष्ट रूपात म्हटले आहे की ध्येय महत्त्वपूर्ण आहे ना की तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग. महाभारतात कृष्णाचा पहिला ध्येय धर्माची रक्षा करणे आणि अधर्माचे नाश करणे आहे.
 
परंपरागत नियम मोडणे
धर्माची रक्षा करण्यासाठी कृष्णाने नियम भंग केले. कर्णांची हत्या याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. युद्ध दरम्यान कर्ण निःशस्त्र असताना अर्जुनने कर्णाचा वध करण्याचा सल्ला दिला. यामुळे पांडव पुढील युद्ध लढून जिंकू शकले.
 
परिस्थितीचा फायदा
महाभारत हे साधारण युद्ध नव्हतं कारण हे दोन कुटुंबातील युद्ध होतं ज्यातून एकाचा सर्वनाश होणे निश्चित होते. म्हणूनच धर्माची रक्षा करण्यासाठी कृष्णाने निःशस्त्र कर्णाला मारण्याचा निर्णय घेतला.

 
सर्वात मोठा अडथळा
कर्ण सर्वात शक्तिशाली होता आणि अर्जुनावर मात करण्यात सर्वात सक्षम. त्यातून एकाची मृत्यू निश्चित होती म्हणून कृष्णाप्रमाणे कर्णाला मारणे आवश्यक होते.
 
धर्माची जीत निश्चित आहे
अधर्माच्या मार्गावर चालणार्‍याचा विनाश निश्चित आहे. कर्ण चुकीचा माणूस नव्हता परंतू त्याने चुकीच्या लोकांचा साथ दिला म्हणून मरण पावला. परंतू त्याच्या कौशल्याचे गुणगान आजही केले जातात.