सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By वेबदुनिया|

जन्माष्टमी व्रताचे महत्त्व

1. अष्टमीचे दोन प्रकार आहेत- पहिला जन्माष्टमी आणि दुसरा जयंती. यात केवळ पहिली अष्टमी आहे.
2. जो व्यक्ती जन्माष्टमीचे व्रत करत नाही तो मनुष्य जंगलात साप आणि वाघ बनून राहतो असे स्कंद पुराणात सांगितले आहे.
3. कलियुगातील भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीत 28 व्या युगात देवकी पुत्र श्रीकृष्ण जन्मले होते असे ब्रह्मपुराणात सांगितले आहे.
4. दिवसा किंवा रात्री कलामात्र रोहिणी नसेल तर विशेषतः पौर्णिमेच्या रात्री हे व्रत करा.
5. श्रावणात शुक्ल पक्षात कृष्ण जन्माष्टमीचे व्रत जो मनुष्य करत नाही तो क्रूर राक्षस होतो. केवळ अष्टमीच्या तिथीलाच उपवास करण्याचे सांगण्यात आले आहे. ती तिथी रोहिणी नक्षत्रात येत असेल तर 'जयंती' नावाने संबोधित केली जाईल असेही भविष्य पुराणात सांगितले आहे.
6. कृष्ण पक्षाच्या जन्माष्टमीत जर एकही कला रोहिणी नक्षत्रात असेल तर जयंती नावानेच संबोधित केले जाते. त्या दिवशी उपवास केला पाहिजे असे पुराणात लिहिले आहे.
7. विष्णुरहस्यादी मध्ये कृष्णपक्षाची अष्टमी रोहिणी नक्षत्रानेयुक्त भाद्रपद महिन्यात असेल तर जयंती नामवाली असे बोलले जाईल.
8. वसिष्ठ संहितेनुसार जर अष्टमी किंवा रोहिणी या दोन्हींचा योग अहोरात्रीत अपूर्ण असेल तर मुहूर्तात मात्र अहोरात्रीच्या योगात उपवास केला पाहिजे.
9. जे पुरूष चांगले आहेत ते जन्माष्टमीचे व्रत नक्कीच करतात. त्यांच्याकडे सदैव स्थिर लक्ष्मी असते. हे व्रत केल्याने त्यांचे संपूर्ण कार्य सिद्धीला जाते असे मदनरत्न स्कंद पुरणात म्हटले आहे.
10. विष्णू धर्मानुसार अर्ध्या रात्रीच्या वेळी रोहिणीत कृष्णाष्टमी असल्यास त्यावेळी कृष्णार्चन आणि पूजन केल्यास तीन जन्माच्या पापांचा नाश होतो.
11. जन्माष्टमी, रोहिणी आणि शिवरात्रीशिवाय तिथी किंवा नक्षत्राच्या शेवटी पारायण करा. यामध्ये केवळ रोहिणी उपवाससिद्ध आहेत असे भृगूने म्हटले आहे.