सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 28 जानेवारी 2019 (14:47 IST)

मंत्र व त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण....

आपण सर्व भाविकहि छोट्या मोठ्या समस्यांमुळे काही सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काही मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे, तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो.
 
पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण हे विसरतो की आपल्या ऋषि मुनी यांनी निर्मित केलेले हे सर्व स्तोत्र मन्त्र यांना केवळ आध्यात्मिक कारण नसून एक वैज्ञानिक पार्श्वभूमी ही असते.
 
ती समजून घेतली तर आपल्या हजारो लाखो वर्षाचा इतिहास असलेल्या हिन्दू धर्माचा अभिमान तर वाटेलच, पण आपण करत असलेली सेवा ही लवकर फलद्रुप होईल व देवाला न मानणाऱ्या लोकांना सडतोड़ उत्तर देता येईल. त्याचसाठी आपण आज काहि मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण करणार आहोत.
 
ऐक्य मंत्र :- ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.
 
नवार्णव मंत्र :- मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे.
मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.
रामरक्षा स्तोत्रातील 'र 'च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते.
 
गायत्री मंत्र :- गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.
 
कालभैरावाष्टक :- कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात.
 
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र :- याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.
 
सरस्वती मंत्र, सुर्य मंत्र, गणपतीअथर्वशीर्ष :- मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.
 
विद्याप्राप्तीकारक स्तोत्र :- या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो.
 
दत्त महाराजांचा मंत्र :- "द्रां " हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून  येण्याचे काम ).
 
शाबरीमंत्र :- *Dopamine हार्मोनची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोनचा balance राखला जातो. जर हार्मोन वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य.