सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 मार्च 2018 (16:45 IST)

चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर, महिला दगावली

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर करण्यात आला असून यामध्ये विवाहितेचा मृत्यू झाला आहे.  

याप्रकरणात डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे संध्या सोनवणे ही 24 वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. तिच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा अहवाल आला. मात्र ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली. संध्याला तिला तातडीने पुण्यातील डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉ. सतीश चव्हाण यांनी एका मांत्रिकाला बोलावून मंत्रतंत्राचा वापर केला. तर सात ते आठ ही धोक्याची वेळ असल्यामुळे दहा ते अकरा या वेळेत शस्त्रक्रिया करण्याचंही डॉ. चव्हाणांनी सुचवल्याचं संध्याच्या भावाने सांगितलं. अखेर संध्या सोनवणेचा रुग्णालयातच मृत्यू झाला.