मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (15:32 IST)

लवकर म्हातारपणा आणते ह्या 6 गोष्टी

जीवनात मनाप्रमाणे सुख नाही मिळाले तर ती गोष्ट दुःखाचे कारण बनते. पण नेहमी मनुष्य अडचण आल्यावर स्वत:च्या चुका शोधण्याबजाय दुसर्‍यांना दोषी ठरवून विचार आणि व्यवहार करतो.  
 
हिंदू धर्मशास्त्रात महाभारतात स्वभावाबद्दल 6 अशा गोष्टी सांगण्यात आले आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती सुखात ही नेहमी दुखी असतो ज्यामुळे याचा वाईट प्रभाव त्याच्या आरोग्य आणि वयावर पडतो. या स्वाभाविक दोषांना दूर करून प्रत्येक व्यक्ती व्यावहारिक जीवनात उत्तम बदल करू शकतो.  
 
महाभारतात लिहिले आहे  –
ईर्ष्या घृणो न संतुष्ट: क्रोधनो नित्यशङ्कित:।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदु:खिता:।।
 
ह्या 6 गोष्टी जाणून सावधगिरी बाळगून तुम्ही तुमच्या स्वभाव आणि विचारांवर विचार करा -
 
(1) क्रोधी अर्थात रागीट व्यक्ती  
(2) नेहमी शंका करणारा  
(3) दुसर्‍यांच्या भाग्यावर जीवन जगणारा अर्थात दुसर्‍यांवर आश्रित किंवा त्यांच्या सुखांवर जीवन जगणारा  
(4) ईर्ष्या ठेवणारा व्यक्ती  
(5) घृणा अर्थात द्वेष करणारा  
(6) असंतोषी अर्थात प्रत्येक गोष्टी कमी शोधणारा किंवा अल्पसंतोषी व्यक्ती