सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

वसंत पंचमी: या प्रकारे करा सरस्वती पूजन

* वसंत पंचमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर एखाद्या शांत जागेवर किंवा मंदिरात पूर्व दिशेकडे मुख करून बसावे.
 
* आपल्यासमोर लाकडाचे चौरंग ठेवावे. त्यावर पांढरा कपडा घालावा आणि त्यावर देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावी.
 
* चौरंगावरच एका तांब्याच्या ताम्हणात किंवा ताटलीत अक्षता ठेवून प्राण-प्रतिष्ठित व चेतनायुक्त शुभ मुहूर्तात सिद्ध केलेलं 'सरस्वती यंत्र' स्थापित करावं.
 
* गणपतीची पूजा करून नंतर सरस्वतीची पूजा करावी. पंचामृताने स्नान करवावे. 
 
* यंत्र आणि चित्रावर केशर किंवा कुंकू वाहावे. पिवळे फुलं, फलं अर्पित करावे.
 
* नंतर दुधाने तयार पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
 
* आता डोळे बंद करून देवी सरस्वतीची आराधना करावी आणि या मंत्राच्या 11 माळ जपाव्या. 
 
ॐ श्री ऐं वाग्वाहिनी भगवती
सन्मुख निवासिनि
सरस्वती ममास्ये प्रकाशं
कुरू कुरू स्वाहा:
 
* पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या व आपल्या मुलांसाठी ऋद्धी-सिद्धी, विद्यार्जन, तीव्र स्मरण शक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी.