मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Shanivar totke : शनिवारी जोडे- चपला चोरी जाणे उत्तम असते

ज्योतिषीनुसार जोडे चपला चोरी होणे शुभ मानले आहे आणि जर शनिवारी हे झाले तर यामुळे शनिदोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. 
 
तसे तर चोरी होणे म्हणजे तुम्हाला धनहानी झाली असे मानले जाते पण जोडे चपलांची चोरी होणे शुभ मानले जाते खास करून जर शनिवारी चामड्याचे जोडे चोरी झाले तर फारच चांगले मानले जाते. ज्या लोकांना जोडे चपला चोरी झाल्यामुळे होणार्‍या लाभ माहीत आहे ते स्वत:हून शनी मंदिरात जोडे चपला स्वत:हून सोडून जातात. 
 
शनिवारी जोडे चोरी झाल्याने काय लाभ होतात? 
असे मानले जाते की चामड्याचे जोडे चोरी झाले तर सर्व त्रास त्याच्याबरोबर चालला जातो.  
 
वास्तवात अशी मान्यता ज्योतिषीय आधारावर प्रचलित आहे, ज्योतिष शास्त्रात शनीला क्रूर आणि कठोर ग्रह मानला जातो, शनी जेव्हा कोणाला विपरीत फल देतो तर त्याकडून फार मेहनत करवून घेतो आणि त्याचे नाममात्र फल देतो. 
 
ज्या लोकांच्या पत्रिकेत साडेसाती किंवा ढैय्या असेल किंवा ज्यांच्या राशीत शनी चांगल्या स्थानात नसेल तर त्यांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते. आमच्या शरीराचे अंग देखील ग्रहांमुळे प्रभावित होतात जसे त्वचा (चामडी) आणि पायांमध्ये शनीचा वास असतो आणि पाय आणि त्वचेशी निगडित वस्तू शनीच्या निमित्ताने दान केल्या तर त्याचे शुभ फल प्राप्त होतात आणि पाय व त्वचेशी निगडित आजारांपासून आराम मिळतो. 
 
आमची त्वचा आणि पायचा कारक ग्रह शनी आहे त्यामुळे चामड्याचे जोडे जर शनिवारी चोरी झाले तर असे मानले जाते की तुमचा त्रास कमी होऊन तुम्हाला आता शनी जास्त त्रास देणार नाही. शनिवारी शनी मंदिरांमध्ये जोडे सोडल्याने देखील शनीच्या कष्टांपासून मुक्ती मिळते.