मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 17 मे 2020 (08:42 IST)

या 4 बायकांनी स्वतःवर दोष घेऊन श्रीरामाला केले वंदनीय

काही अपवादांना वगळता प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा मोलाचा वाटा असतो. त्या मागे तिचे योगदान आणि त्याग दडलेला असतो. आज आपण जाणून घेऊया की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना घडविण्यात कोणाचा वाटा होता. पण असे म्हटले जाते की हे तर सर्व श्रीरामानेच रचले होते. 
होई है सोई जो राम रची राखा.
 
1 मंथरा : राजा दशरथाने जेव्हा चैत्र महिन्यात आपल्या थोरल्या पुत्राचे राज्याभिषेक करण्याची घोषणा केली तेव्हा मंथरेने ही बातमी कैकेयीला कळवली आणि तिने आनंदात येऊन मंथराला रत्नजडित दागिने दिले. पण मंथराने ते फेकून दिले आणि कैकेयीला बरेच काही समजावले. पण कैकेयीने मंथराच्या गोष्टीला दुजोरा न देता मंथरेला सांगितले की ही तर आमच्या कुळाची रघुकुळाची परंपरा आहे की थोरला मुलगाच राज्य सांभाळतो. मग मी माझ्या मुलाचा विचार कसा काय करू ? राम तर सर्वांचे लाडके आहेत. तेव्हा मंथराने कैकेयीला तिच्या 2 वरांची आठवण करून दिली जे तिने राजा दशरथाकडून घेतले होते. हे ऐकून कैकेयीच्या मनात कपट येतं. 
मंथरा ही कैकेयीची दासी होती. ऋषी लोमशच्या मते मंथरा ही गतजन्मी प्रह्लादाच्या पुत्र विरोचन ची मुलगी असे.
 
2 कैकेयी : कैकयी नरेश सम्राट अश्वपतींची मुलगी कैकयी राजा दशरथाची तिसरी बायको होती. ती खूप देखणी तर होतीच त्याच बरोबर ती साहसी पण होती. कदाचित म्हणूनच ती दशरथाला सर्वात जास्त लाडकी असे. एकदा राजा दशरथाने इंद्राच्या सांगण्यावरून देवासूर संग्रामात भाग घेतले होते. त्या युद्धात त्यांच्या पत्नीने कैकयीने त्यांना साथ दिली. या युद्धात दशरथ घायाळ झाले आणि बेशुद्ध पडले. तेव्हा कैकेयी त्यांना रणांगणातून बाहेर घेऊन आली आणि त्यांचे प्राण वाचवले. त्यामुळे दशरथाने प्रसन्न होऊन तिला 2 वर मागण्यास सांगितले. कैकेयी म्हणाली की हे वर मी आता मागत नाही पण वेळ आल्यावर मागेन. नंतर मंथराच्या सांगण्यावरून कैकयीने रामाला वनवास आणि भरताला राज्य मागितले.
 
3 शूर्पणखा : शूर्पणखाचे अरण्यात येऊन प्रभू श्रीरामाशी लग्नाची विनवणी करणे आणि लक्ष्मणाने तिचे नाक कान कापणे राम कथेतील एक वळण होते. लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापल्यावर तिला ज्ञान मिळाले आणि तिला जाणीव झाली की हे कोणी साधारण लोकं नाही. परमेश्वराचे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांची सहायिका बनून तिने प्रभूंच्या हातून खरं, दूषण, रावण, मेघनाद सारख्या राक्षसांचा संहार करविला. अशी आख्यायिका आहे की पूर्वजन्मी शूर्पणखा इंद्रलोकाची नयनतारा नावाची एक अप्सरा होती. 
 
4 सीता : शेवटी सीतेचे नाव देखील घ्यायला हवं. कारण वाल्मीकी रामायणानुसार, श्रीराम वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले तेव्हा राज्याभिषेकानंतर अयोध्येतील लोकांनी सीतेला नाव ठेवायला सुरू केले आणि दोष लावला की ती रावणांकडे राहून आल्यावर सुद्धा पवित्र कशी? याचं कारणामुळे सीतेला राजवाडा सोडून पुन्हा अरण्यात जावं लागले. राज्यसभेत एका ठिकाणी वाल्मीकी म्हणाले, की श्रीराम मी आपल्याला खात्री देतो की देवी सीता पवित्र आणि सती आहे. कुश आणि लव हे आपलेच मुलं आहेत. मी कधीही खोटं बोलत नाही. जर का मी खोटं बोलत असेन तर माझी सर्व तपश्चर्या व्यर्थ जावो. माझ्या या साक्षी नंतर सीता स्वतः आपल्याला शपथ घेऊन स्वतःचे निर्दोष असल्याचे सांगेल.