गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 11 मे 2020 (15:23 IST)

रामायणातील शूर्पणखा बनली श्रीकृष्णाची पत्नी, जाणून घ्या 10 मनोरंजक गोष्टी

वाल्मीकी रामायण, रामचरितमानस, रामचंद्रिका, साकेत, साकेत संत, पंचवटी, या सर्व ग्रंथात शूर्पणखेबद्दलची माहिती मिळते. हे तर सर्वानांच विदित आहे की लक्ष्मणाने  शूर्पणखाची नाक कापली होती. चला तर मग आज आपण तिच्या बद्दलच्या काही निवडक मनोरंजक गोष्टींची माहिती जाणून घेऊया...
 
1 कोण होती शूर्पणखा : ऋषी विश्वंश्रवा आणि कैकेसीची मुलगी लंका नरेश रावणाची बहीण असे शूर्पणखा. शूर्पवत् नखानि यस्या सा शूर्पणखा। अर्थात ज्यांचे नख सुपासारखे असतात. 
 
2 शूर्पणखाच्या पतीचे नाव : कुबेराला लंकेतून हाकलवून रावणाने लंकेत आपले साम्राज्य स्थापून आपल्या बहिणीचे शूर्पणखेचे लग्न कालकाच्या मुलगा दानवराज विद्युविह्याशी लावून दिले. 
 
3 रावणाला दिला शूर्पणखेने श्राप : त्रेलोक्यावर अधिपत्य मिळविण्यासाठी निघालेल्या रावणाने एका युद्धात विद्युविह्णाला सुद्धा ठार मारले. हे बघून शूर्पणखा फार दुखी झाली तिने रावणाला मनातल्या मनातच श्राप दिले की माझ्यामुळेच तुझा नायनाट होणार. रावणाने तिला धीर देत आपल्या भावा खरा बरोबर राहण्यास सांगितले. ती खर सोबत दंडकारण्यात राहू लागली. खरं तर काही दंतकथा अश्याही आहे की एकदा रावण शूर्पणखेच्या घरी गेले असताना त्यांनी विद्युविह्यांना प्रभू श्रीहरींची उपासना करताना बघितले आणि हे बघून चिडून त्यांनी त्याला तिथेच ठार मारले. 
 
4 रामावर शूर्पणखा मोहीत झाली : एका आख्यायिकेनुसार श्रीराम दंडकारण्यामध्ये राहत असताना रामाला बघून शूर्पणखा त्यांच्यावर मोहित झाली. रामाबद्दल जाणण्याची उत्सुकता घेऊन ती त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली की मी या राज्याची स्वेच्छाने फिरणारी राक्षसी आहे. ऋषी विश्रवाच्या बलशाली मुलगा रावण माझे थोरले बंधू असे. मी आपल्याशी लग्न करू इच्छित आहे. आपण माझा स्वीकार करावा. हे ऐकून राम म्हणाले की मी तर विवाहित आहे. 
 
5 लक्ष्मणाने शूर्पणखेची नाक कापली : शूर्पणखानंतर लक्ष्मणाकडे जाऊन आपल्या लग्नाचा प्रस्ताव मांडते. लक्ष्मण तिला नकार देऊन परत तिची श्रीरामा कडे पाठवणी करतात. असा व्यवहार बघून ती फार चिडते आणि सीतेवर आक्रमण करून तिला खाण्यास धावते आणि म्हणते की मी या सीतेलाच संपवून टाकते. हीच नसल्यावर आपण लग्न करू शकतो. सीतेवर हल्ला करण्यासाठी धावते हे बघून लक्ष्मण श्रीरामाच्या आदेशावरून तिचे नाक कान कापतात. असे म्हणतात की हे सर्व तेव्हा घडले ज्यावेळी श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसह पंचवटी वास्तव्यास होते. पंचवटी नाशिक या स्थळी आहे. शूर्पणखाची नाक या स्थळी कापल्यामुळे या स्थळाचे नाव नाशिक झाले. पण काही विद्वानांच्या या गोष्टींवर विश्वास नाही.
 
6 खर आणि दूषणाचे मरणं : कापलेली नाक घेऊन ती आपल्या भावांकडे म्हणजे खर आणि दूषणाकडे जाते. त्यांना सर्व समजतातच ते राम, लक्ष्मणावर आपल्या सैन्यासह हल्ला करतात. तेव्हा श्रीरामा लक्ष्मण आणि सीतेला एका कंद्राकडे जाण्यास सांगून एकट्यानेच खर आणि दूषणांना त्यांच्या सैन्यासह ठार मारतात. समस्त मुनी आणि गंधर्व देखील हे युद्ध बघण्यासाठी आले असे. दूषण, त्रिशिरा आणि राक्षस मारले गेले समजतातच खर स्वत: रामाशी युद्ध करावयास जातो आणि मारला जातो. रामाने खर, दूषण, त्रिशिरा समवेत 14 सहस्त्र राक्षसांचा नायनाट केला.
 
7 रावणाच्या सभेत शूर्पणखा : पंचवटीमध्ये लक्ष्मणाकडून अपमानित झालेली शूर्पणखा दुखी झालेली असते. ती आपले दुःख आपल्या भाऊ रावणाला सांगते आणि सीतेबद्दलची माहिती त्याला देते आणि सांगते की रामाची बायको सीता खूप सौंदर्यवती आहे आणि ती आपली राणी बनण्याच्या योग्य आहे. रावणाने आपल्या बहिणीच्या अपमानाचे सूड घेण्यासाठी आपल्या मामा मारीचसह सीतेच्या हरण करण्याचा कट रचला. 
 
8 शूर्पणखेचे पुनर्जन्म : असे म्हणतात की पूर्वजन्मी शूर्पणखा इंद्रलोकाची एक नयनतारा म्हणून अप्सरा असे. त्यावेळी पृथ्वीवर वज्रा म्हणून एक ऋषी तपश्चर्या करीत असे. त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी इंद्र हे नयनतारा हे कार्य करण्यास सांगतात. ऋषी वज्राची तपश्चर्या मोडल्याने त्यांनी नयनताराला एक राक्षसी होण्याचे श्राप दिले. ती ऋषींची गयावया करू लागली. त्यावर वज्रा ऋषी म्हणाले की या राक्षसी जन्मातच तुला प्रभूंचे दर्शन होतील. तिच अप्सरा आपल्या देह त्यागल्यावर राक्षसी शूर्पणखा बनली. 
 
9 शूर्पणखेचे डोळे उघडले : शूर्पणखेचे नाक आणि कान लक्ष्मणाने कापल्यावर तिला लक्षात येते की हे कोणी सहज लोकं नाही. तिने देवाचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना साहाय्य करून देवांच्या हातून खर, दूषण, रावण, मेघनाद, कुंभकर्ण सारख्या राक्षसांचा नायनाट करविला. प्रभू प्राप्तीसाठी पुष्कराजमध्ये जाऊन पाण्यामध्ये उभारून शिवाचे ध्यान करू लागली. असे ही म्हटले जाते की रावणाचा संहार झाल्यावर शूर्पणखा दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे गेली आणि अरण्यात त्यांच्यासोबतच आश्रमात राहू लागली.
 
10 श्रीकृष्णाची बायको : अशी आख्यायिका आहे की शिवाची पूजा केल्यावर शंकराने शूर्पणखेला दर्शन देऊन वर प्राप्ती केली की 28व्या द्वापर युगात श्रीराम श्रीकृष्णावतार घेतल्यावर कुब्जाच्या रूपात तुला कृष्णाकडून पतीचे सुख मिळेल. तेच तुझे कुबडे ठीक करून तुझे नयनताराचे अप्सरा रूप तुला परत मिळेल.