शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अश्वमेघ यज्ञ : याबद्दलच्या 6 महत्त्वाच्या गोष्टी.

अश्वमेघ यज्ञाबद्दल बऱ्याच जणांच्या मनात काही चुकीच्या धारणा आहेत. काय असतं हे अश्वमेघ यज्ञ ? का बरं यज्ञाच्या अश्वाला सीमे बाहेर सोडले जाते. अश्वमेघ यज्ञाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या.
 
1 अश्वमेघ यज्ञाला काही विद्वान राजकीय तर काही अध्यात्मिक मानतात. असे म्हटले आहे की अश्वमेघ यज्ञ तेच सम्राट करू शकतात ज्यांनी सर्व राजांवर आपले अधिपत्य गाजविले असतं. 
 
2 काळांतरात जो राजा ज्या समाजाशी निगडित असतो त्याला त्या समाजाच्या सर्व रीती भाती पाळाव्या लागतात. त्यामुळे अनेक वाईट प्रकाराच्या रीती सुद्धा त्याला पाळाव्या लागतात. पण वैदिक पद्धतीने केलेल्या अश्वमेघ यज्ञालाच धर्मसम्मत मानले गेले आहे.
 
3 आधीच्या काळात अश्वमेघ यज्ञ वसंत ऋतू किंवा उन्हाळ्यात होत होते. या सर्व प्रारंभिक विधी पूर्ण होता होता जवळपास 1 वर्ष लागतो. विधीच्या दरम्यान शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे होतात. 
 
4 यज्ञ केल्यावर या अश्वाला मोकळे सोडले जात असे. त्यामागे राजाचे सैन्य जात असे. हा अश्व एक दिग्विजय यात्रेंवर निघालेला असतो. सर्व लोकं त्याच्या परतीची वाट बघत असतात. या अश्वाला जे कोणी चोरले तर त्या राजाला युद्ध करावे लागणार. किंवा हा अश्व गहाळ झाल्यावर परतही प्रक्रिया दुसऱ्या अश्वांपासून सुरु केली जाते.
 
5 अशी आख्यायिका आहे की हे अश्वमेघ यज्ञ ब्रह्महत्या केली असल्यास, स्वर्गप्राप्ती, मोक्ष प्राप्तीसाठी करीत होते.
 
6 काही विद्वानांची अशी मान्यता आहे की अश्वमेघ यज्ञाचा संबंध आध्यात्मिकतेशी आहे. हे गायत्री मंत्राशी निगडित असावे. 
 
श्रीराम शर्मा आचार्य म्हणतात की "अश्व समाजातील वाईट गोष्टीचे प्रतीक आहे. तसेच मेघ म्हणजे सर्व वाईट गोष्टींचा मुळापासून नायनाट करणे. अशे आढळून आले आहे की ज्या ज्या ठिकाणी हे अश्वमेघ यज्ञ केले गेले आहे तेथे गुन्हेगारी आणि आक्रमकता कमी झाल्याचे प्रमाण दिसून येतात. 
 
अश्वमेघ यज्ञ पर्यावरणाच्या संतुलनासाठी आणि आध्यात्मिक वातावरणाच्या शुद्धी साठी गायत्री मंत्राशी निगडित आहे.
 
गुप्त साम्राज्याचा नायनाट झाल्यावर अश्वमेघ यज्ञ होणे बंदच झाले आहे.