उत्तर रामायण : सामर्थ्यवान लवणासुराच्या काही निवडक गोष्टी जाणून घेऊ या..
महर्षी वाल्मीकीने लिहिलेल्या रामायणातील उत्तरकांडमधील लवणासुराच्या वध केल्याचे समजते. लवणासुर एक दानव असे. आपण त्याचा 6 निवडक गोष्टी जाणून घेऊ या...
1 लवणासुर एक भयंकर दानव असे. त्याच्या वडिलांचे नाव मधू आणि आईचे नाव कुंभिनी असे. कुंभिनी लंकेच्या राजा रावणाची सावत्र बहीण असे. लवणासुराचा स्वभाव देखील रावणासारखा तापट आणि अभिमानी होता.
2 लवणासुर हा मथुरेपासून साडे तीन मैलापासून दक्षिण -पश्चिम दिशेला असलेल्या मधुपुरी राज्याचा राजा होता. मधुपूर जवळील मधुबन ग्रामात लवणासुराची गुहा असे तिथं त्याचे साम्राज्य असे. नंतर शत्रुघ्नने लवणासुराचे वध करून मधुपुरीला मथुरा असे नावं दिले.
3 लवणासुराने रामाचे वंशज चक्रवर्ती महाराज युवनाश्व मांधाता पासून त्यांचे राज्य आपल्या अमोघ त्रिशूळाच्या बळावर हिसकावून घेतले होते. हे त्रिशूळ त्याला महादेवांनी वरदान म्हणून दिलेले होते.
4 लवणासुर हा देखील आपल्या मामा रावणासारखाच महादेवांचा भक्त होता. त्यांचा परंपरेचे पालन करत तो रुद्राची दानवी पूजे मध्ये पशू, माणसांची आणि ऋषी मुनींची बळी देत असे. वैदिक यज्ञ करणाऱ्या ऋषी मुनींना तो त्रास द्यायचा.
5 महर्षी वाल्मीकीच्या रामायणानुसार सर्व देव शत्रुघ्नाला लवणासुराचे वध करण्याची विनवणी करावयास येतात आणि त्याला आदेश देतात. शत्रुघ्न सर्व देवांच्या विनवणीला मान देऊन लवणासुराशी युद्ध करावयास निघत असताना वाटेत महर्षी वाल्मीकी आणि ऋषी च्यवनयांचा आश्रमात थांबतात. नंतर ऋषी च्यवन त्यांना अमोघ त्रिशूळाच्या संदर्भात शत्रुघ्नला सांगतात. लवणासुराशी युद्धामध्ये शत्रुघ्न लवणासुराचा वध करतात आणि मधुपुरीला मधुराच्या नावाने नवे साम्राज्य उभारतात.
6 महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर जग विख्यात आहे. अशी आख्यायिका आहे की इथेच लवणासुराचे वध केले होते. त्यामुळे या सरोवराला लवणासुर असे नाव देण्यात आले. मग काळानंतर याचे अपभ्रंश होवून 'लोणार' झाले. हे सरोवर लोणार गावातच असे. या सरोवराला युनेस्को ने आपल्या यादीमध्ये मान दिले आहे.