शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (11:29 IST)

रामायण काळातील हे 7 महारथी आजही जिवंत आहे...

संशोधकांच्या मते, भगवान श्रीरामाचा काळखंड इ.स.पू. 5000 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजेच आजच्या 7 हजार वर्षांपूर्वीचा. तथापि, पुराणात वेगळी धारणा आहे. रामायण काळातील बरेच लोकं अजूनही जिवंत आहेत, जाणून घेऊ या कोण आहेत ते.
 
1 मारुती : भगवान श्रीरामाचे भक्त मारुती अजूनही जिवंत आहे. प्रभू श्रीराम आणि देवी सीतेच्या कृपेने ते या पृथ्वीवर एक चक्र राहतील.
 
2 विभीषण : भगवान श्रीरामाने लंकेशच्या अनुज विभीषणांना अजरामर होण्यासाठी आशीर्वाद दिला. विभीषण हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत आणि ते आजतायगत जिवंत आहे. विभीषणानांही मारुतींसारखे चिरंजीवी होण्याचे वरदान लाभले आहेत. विभीषणसुद्धा शारीरिकरीत्या जिवंत आहे.
 
3 काकभुशुंडी : भगवान गरूडांना रामकथा ऐकविणारे काकभुशुंडी याना त्यांच्या गुरु ऋषी लोमेश यांनी इच्छामरणाचे आशीर्वाद दिले होते. ऋषी लोमेश यांनी काकभुशुंडीना श्राप दिले होते ज्यामुळे ते कावळा बनले होते. ह्याचा पश्चात्ताप नंतर लोमेश ऋषी यांना झाला. त्यांनी काकभुशुंडीना श्रापापासून मुक्त केले आणि राममंत्र दिले तसेच इच्छामरणाचा आशीर्वाद दिला. अशी आख्यायिका आहे की कावळ्याचा देह मिळाल्यावर तसेच राममंत्र मिळाल्यावर त्या देहाशी त्यांना प्रेम झाले आणि ते त्याचं रूपात राहू लागले. काळातरानंतर ते काकभुशुंडीच्या नावाने ओळखले गेले. 
 
4 ऋषी लोमेश :  हे सर्वोच्च तपस्वी आणि विद्वान होते. पुराणात त्यांना अमर मानले गेले आहे. हिंदू महाकाव्य महाभारतानुसार, ते पांडवांचे थोरले बंधू युधिष्ठिर यांचा समवेत तीर्थक्षेत्री गेले असताना सर्व तीर्थक्षेत्राची माहिती दिली. ऋषी लोमेश हे लवाळ होते त्यांना महादेव कडून वरदान मिळाले होते की एका युगा नंतर त्यांचे लव गळण्यास सुरुवात होईल आणि सगळे लव गळल्यावरच मृत्यू प्राप्त होवो.
 
5 जामवंत : संपूर्ण युग संपेपर्यंत जगण्याचे वरदान अग्निपुत्र जामवंतांना प्रभू श्रीरामांकडून मिळाले आहे. अशी आख्यायिका आहे की जामवंत यांचा जन्म देवासूर संग्रामातील देवतांच्या मदतीसाठी अग्निदेवापासून झालेला आहे. ह्यांची आई गंधर्व कन्या होती. जामवंतांचा जन्म विश्वाच्या सुरुवातीस विश्वाच्या पाहिल्या युगात झाला होता. जामवंतांच्या समोरच वामन अवतार झाला होता. जामवंत राजा बळीच्या काळातही होते. राजा बळीकडे तीन पावलांची जमीन मागून भगवान वामनाने बळीला चिरंजीवी होण्याचे वरदान दिले त्या प्रमाणे राजा बळीला पाताळाचे राजा बनविले. प्रभू विष्णूंच्या वामन अवताराच्या वेळेस जामवंत तरुण होते. जामवंत हे चिरंजीवी आहे. 
 
6 मुचुकुंद : मांधांतांचा मुलगा मुचुकुंद त्रेतायुगात इक्ष्वाकू वंशाचे राजा होते. यांचा मुलीचे नाव शशिभागा असे. एकदा देवतांच्या हाकेला जाऊन देव आणि राक्षसांच्या मध्ये युद्ध झाले त्या युद्धात मुचकुंदाने देवतांना पाठिंबा दिला त्यामुळे देव युद्ध जिंकले. इंद्राने त्यांना वर मागण्यास सांगितले त्यांनी परत पृथ्वीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. अशी आख्यायिका आहे की इंद्राने त्यांना सांगितले की पृथ्वी आणि स्वर्गात काळाचे अंतर आहे. आता तो काळपण नाही आणि आपले सर्व बंधू मरण पावले आहे. हे कळल्यावर मुचकुंद यांना खूप वाईट वाटले. त्यांनी इंद्रांकडून वर मागितले की मला झोपायचे आहे. तेव्हा इंद्रांनी त्यांना वर दिले की आपण कुठल्याही निर्जन स्थळी झोपावे, आणि जर कोणी त्यांना जागे केले तर मुचकुंदाची दृष्टी पडल्यास तो कोसळून पडेल.
 
कालयवन आणि कृष्णामधील संघर्ष संपल्यावर कालयवन श्रीकृष्णाकडे धावत गेला श्रीकृष्णाने तिथून पळ काढतातच कालयवन त्यांना पकडण्यासाठी त्यांचा मागे धावत गेला. श्रीकृष्ण आपली लीला दाखवत पळत होते. कालयवनाला असे वाटत होते की आता पकडले. श्रीकृष्ण बऱ्याच लांब एका गुहेत गेले त्यांचा पाठी कालयवन देखील गुहेत शिरले. तेथे त्यांनी एका माणसाला झोपलेले बघितले. त्यांना वाटले की श्रीकृष्णच वेष बदलून लपून बसले होते. म्हणून त्यांनी त्या माणसाला जोरात लाथ मारली. तो माणूस बऱ्याच काळ झोपी गेल्याने लाथ मारल्याचा धक्क्यामुळे जागी गेले आणि हळू-हळू त्यांनी आपले डोळे उघडले. इकडे तिकडे बघत असताना त्यांना कालयवन दिसला त्याला बघून ते फार चिडले आणि त्याचा अंगातून ज्वाळा निघू लागल्या. त्या ज्वाळेमध्ये कालयवनचे देह जळाले. ते गुहेत झोपलेले व्यक्ती स्वयं राजा मुचकुंद होते. ते इक्ष्वाकुवंशी महाराज मांधान्ताचा मुलगा अश्या प्रकारे कालयवन चा अंत झाला. अशी आख्यायिका आहे की त्या नंतर मुचकुंद परत आले आणि ते आजही झोपले आहे.
 
7 परशुराम : भगवान परशुराम हे विष्णूंचे सहावे अवतार आहे. ते आजतायगत जिवंत आहे. त्रेतायुगांपासून ते द्वापारयुगापर्यंत परशुरामाचे लक्षाने शिष्य आहे. भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांचे जीवन, महाभारत काळाचे शूर योद्धे, शस्त्रे शिकवणारे गुरु आणि शस्त्रे आणि शास्त्रांचे श्रीमंत ऋषी परशुरामाचे आयुष्य हे संघर्ष आणि विवादाने भरलेले आहे. 
 
एकदा सतयुगात गणेशाने परशुरामांना महादेवाशी भेटावयास रोखल्यावर संतापलेल्या परशुरामाने आपल्या परशुने त्यांचा वर प्रहार केल्यास गणेशाचे एक दात तोडले होते. तेव्हा पासून गणेशाला एकदंत म्हटले जाते. त्रेतायुगात त्याने राजा जनक, दशरथ व इतर राजांचा सन्मान केला. सीता स्वयंवरात त्यांनी श्रीरामाचे अभिवादन ही केले. द्वापर युगात त्यांनी कौरव सभेत कृष्णांना पाठिंबा दिला होता आणि त्यांनी श्रीकृष्णांना सुदर्शन चक्र दिले होते. द्वापरात त्यानेच कर्णाला खोटं बोलण्याची शिक्षा म्हणून सर्व शिक्षा विसरण्याचे श्राप दिले होते. भीष्म, द्रोण आणि कर्णाला त्यांनीच शस्त्र दिले होते. 
 
अश्या प्रकारे परशुरामांच्या अनेक कथा आहे. त्यांची तपश्चर्या बघून भगवान विष्णूने त्यांना युगातील शेवटपर्यंत तपश्चर्या करून पृथ्वीवर जगण्याचे वरदान दिले आहे. भगवान परशुराम हे कोणत्याही एका विशिष्ट समाजाचे आदर्श नसून संपूर्ण हिंदू समाजातील आहे आणि चिरंजीवी आहे. रामाच्या काळात आणि कृष्णाच्या काळात ही ते दिसले होते. भगवान श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र देणारे ही तेच होते. असे म्हटले जाते की काळिकाळाच्या शेवटीसुद्धा ते राहणार अशी आख्यायिका आहे की पृथ्वीच्या शेवट होई पर्यंत ते तपश्चर्या करतील. भगवान परशुरामांच्या तपश्चर्यांचे स्थळ म्हणून महेंद्रगिरी पर्वत होते आणि शेवटी त्याच डोंगरावर जाऊन जगाच्या शेवट पर्यंत तपश्चर्या करणार आहे.