सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 27 एप्रिल 2020 (16:28 IST)

जर दैविक शक्ती आपल्याला मदत करीत आहे, तर असे असतील संकेत

जगात असे बरेच लोकं आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात कोणती न कोणती दैवीक शक्ती मदत करीत असते. आता प्रश्न असे की सामान्य माणसाला कसे ओळखता येईल की कुठली दैविक शक्ती त्याला साहाय्य करीत आहे. किंवा तो करीत असलेली पूजा त्याला पावत आहे. चला तर मग जाणून घेऊ ह्याचा 11 संकेताबद्दलची माहिती. 
 
1 उत्तम चारित्र्य - 
शास्त्रांमध्ये म्हटले आहे की दैवीक शक्ती केवळ त्यांनाच साहाय्य करते जे इतरांचे दुःख समजून घेतात, वाइटांपासून लांब राहतात, नकारात्मक विचारांपासून लांब राहतात, जे नियमाने त्यांचा आवडी आणि इच्छेनुसार पुण्य कामामध्ये व्यस्त राहतात, या पासून जुळलेले आहे. जर आपल्याला असे वाटते की हो मी असा आहे तर मग दैविक शक्ती आपणास मदत करीत आहे. आपण हे लक्षात घ्यावे की आपण चांगल्या मार्गावर चालत आहात. आणि वरून चांगल्या शक्ती आपल्याकडे बघत आहेत.
 
2 ब्रह्म मुहूर्त - 
विद्वान म्हणतात की जर तुमचे डोळे एका दिव्यकाळात म्हणजे उत्तररात्रो 3 ते 5 च्या दरम्यान अचानक उघडत असतील तर आपणं समजावे की दैविक शक्ती आपल्या पाठीशी आहे. कारण या वेळेत दैव जागृत होतात. जर आपण आपल्या लहान वयापासून ते तारुण्य वयापर्यंत या काळात जागत असाल तर हे समजावे की दैविकशक्ती आपल्या माध्यमातून काहीतरी साध्या करू इच्छित आहे आणि ती शक्ती आपल्याला एक चांगली आत्मा म्हणून दर्शवित आहे. म्हणून आपल्याला उठवून असे संकेत देत आहे की हे जीवन झोपण्यासाठी नाही. आपल्याला या जगात बरीचशी कामे करावयाची आहे. असे म्हणतात की या काळात सत्वगुण- प्रबळ लोकं स्वतः उठतात. आयुर्वेदानुसार, यावेळी वाहणाऱ्या वायूला अमृततुल्यं म्हणतात. ह्या काळाला अमृतवेळ देखील म्हणतात. या काळात जगातील केवळ 13 % लोकं झोपी गेलेली असतात.
 
3 स्वप्नांत देव दर्शन -
आपणं स्वप्नात जर का पुन्हा-पुन्हा एखादे देऊळ दिसत असेल किंवा आपण उडताना किंवा देवी देवतांशी बोलतांना बघत असाल तर समजावे की देवाची कृपादृष्टी आपल्यावर आहे. 
 
4 अंतर्ज्ञान -
जर आपणास आगाऊ घटित घटनांची माहिती असल्यास किंवा त्यांचा अंदाज येऊ शकत असेल तर समजावे की दैविक शक्ती आपल्यावर कृपादृष्टी ठेवत असे.
 
5 कौटुंबिक प्रेम - 
आपली पत्नी, मुलगा, मुलगी आणि आपले सर्व नातेवाईक आपली आज्ञा पाळत असल्यास, ते सर्व तुमच्यावर प्रेम करतात आणि आपणही त्यांच्यावर प्रेम करता. म्हणून असे समजावे की दैविक शक्ती आपल्यावर प्रसन्न आहेत.
 
6 नशिबापेक्षाही वेगवान - 
आपल्या आयुष्यात आपणास अचानक फायदा मिळत आहे, आपल्या कार्यात कुठलाही अडथळा येत नसल्यास तसेच सर्व कार्ये आपल्यासाठी अगदी सहज असल्यास दैविक शक्ती आपल्या बरोबरच आहे असे समजावे, आणि ती आपली मदत करीत आहे.
 
7 सुगंधी भावना -
जर कधी-कधी आपल्याला असे वाटत असल्यास की आपल्या ओवतीभोवती कोणीतरी आहे. किंवा आपल्या कसलातरी सुवास येत असल्यास समजावे की आपल्या मदतीसाठी कुठलीतरी अलौकिक शक्ती आपल्या सभोवताल आहेत.
 
8 सकारात्मक वारं - 
आपण पूजा करीत असताना आपल्याला अचानक सौम्य वाऱ्याची झुळूक अनुभवल्यास आणि शरीरामध्ये कंपन जाणवल्यास असे प्रथमच अनुभवल्यास समजावे की देव आपल्यावर प्रसन्न आहेत.
 
9  गारवाऱ्याने वेढलेले असल्यास - 
जमिनीवर असताना, कधी-कधी आपल्या भोवती ढग किंवा थंड वाऱ्याचा घड असल्याचे जाणवत असल्यास कुठल्यातरी दैविक शक्तीने आपल्याला वेढलेले आहे. हे सहसा अत्यंत आदरणीय व्यक्तींबरोबरच घडते.
 
10 प्रकाश मान - 
सहसा आपणास एक तेजस्वी प्रकाशाची एक किरण दिसते. ज्याची आपण कधीही कल्पना केलेली नसते. किंवा आपल्या कानात गोड संगीत ऐकू येत असल्यास आपल्याला हे बघून आश्चर्य वाटेल की जवळपास कोणतेही संगीत नाही, तरीही कानात शिट्टी सारखे वाजल्याचे ऐकू येत असल्यास समजावे की कोणती दैविक शक्ती आपल्या बरोबरच आहे. असे त्यांचा बरोबर घडत असते जे आपल्या इष्ट आणि आराध्य देवतेचे सतत नाम समरण करीत असतात.

11 एखाद्याचा आवाज ऐकणे - 
आपण रात्री गाढ झोपलेले असताना आपल्याला असे वाटते की आपणास कोणीतरी आवाज देत आहे. आपण जागे होतात पण आपल्याला कळते की इथेतर कोणीच नाही. पण आवाज स्पष्ट होता. हे आपल्या बरोबर बऱ्याचदा घडते, म्हणून आपण समजावे की आपल्याला काही अलौकिक शक्ती मिळाली आहे. अश्यावेळी आपण मारुतीला स्मरून त्यांचे आभार मानावे.