सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 9 मे 2020 (18:21 IST)

महाभारत कथा : अभिमन्यूला ज्याने ठार मारले त्या जयद्रथ बद्दलच्या 6 गोष्टी जाणून घ्या

महाभारतात जयद्रथाची काही वेगळीच भूमिका असे. त्याने अशी काही कामे केली होती त्यामुळे त्याचे नाव अमर झाले. त्याचा विषयी या 6 गोष्टी जाणून घेऊया
 
1 सिंधू सभ्यता महाभारताचा काळामध्ये अस्तित्वात होती. त्या काळी ह्याचे नाव सिंधू देश म्हटले जात होते. या सिंधू देशाचा राजा जयद्रथ असे. हा कौरवांकडून पांडवांशी लढला होता.
 
2 जयद्रथाचे लग्न राजा धृतराष्ट्राचा मुली दुशाला सोबत झाले असे. या नात्याने जयद्रथ दुर्योधनाचा मेहुणा असे.
 
3 द्युतामध्ये आपले सर्वस्व पणाला लावून पांडव वनवासाची शिक्षा भोगत असताना अरण्यामध्ये त्याची वाईट दृष्टी द्रौपदीवर पडल्यावर तो तिच्या समक्ष विवाह करण्याचा प्रस्ताव मांडतो. द्रौपदीने नकार दिल्यावर तिच्या वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो आणि तिचे हरण करून नेण्याचा प्रयत्न करतो. पण एकाएकी पांडव आल्याने ती वाचते. भीम जयद्रथाला मारहाण करतो. द्रौपदीच्या इच्छेनुसार त्याचे संपूर्ण केस काढून फक्त पांडवांच्या नावाच्या 5 वेण्या ठेवायला सांगते. आणि सर्व जनते समोर त्याला अपमानित केलं जातं. 
 
4 युद्धामध्ये ज्यावेळी गुरु द्रोण चक्रव्यूहाची रचना करतात. त्या वेळी अभिमन्यू शेवटी रथाचे चाक उचलून स्वतःला सात महारथींपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना जयद्रथ मागून येऊन निःशस्त्र अभिमन्यूवर तलवारीने मागून वार करून ठार मारतो. अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केल्यावर त्याचा रक्षणासाठी जाणाऱ्या 4 ही पांडवांना रोखून धरतो.
 
5 अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी अर्जुनाला कळताच अर्जुन फार चिडतो आणि आपल्या मुलाच्या मारेकरीचा नायनाट करण्याचा निर्णय घेतो. आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या जयद्रथाला दुसऱ्या दिवशी सूर्य मावळण्याच्या आत संपविण्याची प्रतिज्ञा घेतो. असे करता आले नाही तर स्वतःचे जीवन संपवणार अशी घोषणा करतो. असे ऐकताच कौरवांना आनंद होतो ते जयद्रथाला लपवून ठेवतात. जेणे करून जयद्रथ अर्जुनाला सापडणार नाही आणि अर्जुन स्वतःचा जीव देईल. अशाने युद्धाचा निकाल कौरवांच्या पक्षामध्ये लागेल. पांडवांना हे कळताच त्यांना काळजी वाटू लागते. त्यांना नैराश्य येतं. अश्या परिस्थितीमध्ये देखील केवळ एकच होते जे हसत होते आणि ते होते फक्त भगवान श्रीकृष्ण. 
 
6 दिवसभर दोन्ही पक्षाचे युद्ध सुरू होते. पण जयद्रथ कुठेही दिसत नव्हता. शेवटी कृष्णाने एक माया केली. त्यांनी सूर्याला लपवून दिले. सगळ्यांना वाटले की आता सूर्य मावळला आहे. हे बघून अर्जुन आत्मदहन करण्याचा तयारीला जात असताना सर्व कौरव ते बघण्यासाठी एकत्र होतात. उत्सुकतेवश जयद्रथ हे बघण्यासाठी बाहेर पडतो आणि अर्जुनाची थट्टा करतो. तेवढ्यात श्रीकृष्ण माया करून लपविलेल्या सूर्याला बाहेर काढतात आणि अर्जुनाला म्हणतात की अर्जुन अजून सूर्य काही मावळला नाही. तो बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. हे बघून जयद्रथ घाबरून पळ काढतो. परंतु अर्जुन त्याला पळूच देत नाही आणि बाणने त्याचे डोकं कापून असे उडवतो की थेट त्याचा वडिलांच्या मांडीतच जाऊन पडतं. ते ध्यान लावून बसलेले असतात. त्यांना काही समजेल त्याआधीच ते चटकन उभे होतात आणि मांडीतले जयद्रथाचे डोके न बघताच जमिनीवर फेकून देतात. त्याच क्षणी जयद्रथ आणि त्याच्या वडिलांचा अंत होतो.