सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दीपिका द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार

बॉलिवूड दीपिका पादुकोण आता आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. महाभारतावर येणाऱ्या चित्रपटामध्ये दीपिका द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सहनिर्मातीही तीच असून तिच्यासोबत मधु मंटेनाही या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

चित्रपट व्यवसाय समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती काही भागांमध्ये होणार असून 2021च्या दिवाळीपर्यंत पहिला भाग प्रदर्शित होणार आहे.