सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दबंग 3 चा ट्रेलर या शैलीत लॉन्च होईल

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’ चा ट्रेलर अनोख्या पद्धतीने लाँच होणार आहे. सलमानचे चाहते दबंग 3 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. आतापर्यंत चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची अनेक पोस्टर्स प्रसिद्ध केली आहेत. तथापि, चाहत्यांना अद्याप चित्रपटाच्या कथेविषयी काहीही माहिती नाही. अशा परिस्थितीत चाहते चित्रपटापूर्वी ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात असतात. दबंग 3 च्या ट्रेलरसाठी सलमान खानचे चाहते बरेच उत्सुक आहेत.
 
23 ऑक्टोबरला दबंग 3 चा ट्रेलर रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी सलमान खान चुलबुल पांडे अवतारात दिसणार असून प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. यावेळी ट्रेलर एका अनोख्या पद्धतीने लाँच केला जाईल. मुंबईव्यतिरिक्त देशातील इतर शहरांमध्येही ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. ट्रेलर चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, दिल्ली, जयपूर, कोलकाता, अहमदाबाद, इंदूर आणि लखनऊ येथे एकाच वेळी प्रक्षेपित होईल. सलमानाचे चाहते प्रत्येक शहरातील इव्हेंट दरम्यान उपस्थित राहतील आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते त्यांच्या आवडत्या स्टारशी बोलू शकतील. दबंग 3, 20 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.