शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (12:54 IST)

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे टॅलेंट स्वस्तात विकू नको

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत करीना कपूर आणि आलिया भट्ट यांचा समावेश आहे. अलीकडेच दोन्ही अभिनेत्री करण जौहरसमवेत जिओ मामी मूव्ही फेस्टिवलमध्ये दिसल्या.
 
या इव्हेंट दरम्यान आलिया आणि करीनाने करण जोहरसोबत बर्‍यापैकी चर्चा केली. मात्र, या चर्चेदरम्यान करीना कपूरने आलिया भट्टला सल्लाही दिला.
 
चर्चेदरम्यान करीना कपूर म्हणाली की तिच्या पिढीतील सर्व कलाकारांमध्ये आलिया सर्वोत्कृष्ट आहे.
त्यानंतर करीना कपूर, आलिया भट्टला सल्ला देताना म्हणाली, 'तू कधीपण उंदीरांच्या शर्यतीत सामील होऊ नको. तुला तुझ्या प्रतिभेला न्याय द्यायला हवा आणि कधीही या टॅलेंटाला स्वस्तात विकू नको. '
आलिया करीनाला आपला आदर्श मानते. आलियाला करिनाची वर्क स्टाइल, फॅशन सेन्स ही प्रत्येक गोष्ट आवडते. त्याचबरोबर करीना देखील आलियाला खूप प्रतिभाशाली मानते. आलिया भट्ट करिना कपूरच्या या सल्ल्याचे किती पालन करते हे आता पाहावे लागेल.