गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (10:45 IST)

कार्तिकने 'पति पत्नी और वो'चे पोस्टर शेअर केले, भूमीबद्दल लिहिले- जरा हाई मेंटेनेन्स हैं हम

Karthik shared the poster of 'Husband Wife and Wo'
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो'चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यन बाइकवर बसलेला दिसत आहे. या चित्रपटाचे पोस्टर कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. चित्रपटात तो चिंटू त्यागीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 6 डिसेंबराला प्रदर्शित होणार आहे.
  
कार्तिकनंतर भूमीचा लुक समोर आला: भूमी पेडणेकरचा लुकही कार्तिकनंतर रिलीज झाला. ज्यामध्ये ती हातात एक पुस्तक धरून आहे. भूमीबद्दल लिहिले आहे - जरा हाई मेंटेनेन्स हैं हम. चित्रपटात भूमीने वेदिका त्रिपाठीची भूमिका साकारली आहे.  
 
सोनूचा टीटूही दिसणार फर्स्ट लुकच्या रिलीजपूर्वी सनी सिंगची एंट्रीही या चित्रपटात झाली आहे. ज्यामध्ये तो कार्तिक आर्यनसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याआधी या दोघांच्या जोडीने 'सोनू के टीटू की स्वीटी' मध्ये धमाल केला आहे. सनी आणि कार्तिक यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून याची पुष्टी केली होते.
 
1978 मध्ये बनले आहे या टायटलचे चित्रपट :  पति पत्नी और वो या टायटलने 1978 मध्ये चित्रपट बनला आहे. ज्यामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन बलदेव राज चोप्रा यांनी केले होते.