सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

माधुरी दीक्षित चित्रपट निर्मिती क्षेत्रात

अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आता चित्रपट निर्मिती करत आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'पंचक'. माधुरीसह तिचे पती श्रीराम नेने या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. माधुरीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे.  माधुरीने या फोटोच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेत आणखी एका फोटोमध्ये या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माधुरीनं शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
पंचक या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जठार करणार आहेत. चित्रपटात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदीता पाटकर, भारती आचरेकर, दीप्ती देवी, सतीश अळेकर, आशिष कुलकर्णी आणि बाप्पा जोशी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.