परिणीती करतेय सायनाच्या बायोपिकसाठी मेहनत, पहा फोटो
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा ही सायनाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी ती बॅडमिंटनचे धडे घेत आहे. यासाठी ती भरपूर सराव आणि मेहनत घेत आह, तिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या चित्रपटासाठी ती सध्या कशाप्रकारे मेहनत घेतेय, त्याचा एक फोटो तिने शेअर केला आहे. या चित्रपटाचे अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते. परिणीती ४-५ महिन्यांपासून या चित्रपटाची तयारी करत आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. विविध ठिकाणी हा चित्रपट शूट करण्यात येणार आहे.