सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेत्री कल्की आई होणार

बॉलिवूड अभिनेत्री कल्की केकला प्रेग्नंट आहे. बॉयफ्रेण्ड गाय हर्षबर्गपासून कल्की गर्भवती आहे. कल्कीने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन कल्कीने आपण गाय हर्षबर्गसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं याआधी  सांगितलं होतं. आपण आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर करताना मातृत्वसुखाच्या चाहूलीने आपण शहारल्याचं कल्की सांगते.
 
विशेष म्हणजे बाळाच्या जन्माचं प्लॅनिंगही कल्कीने केलं आहे. वॉटर बर्थच्या माध्यमातून आपली प्रसुती व्हावी, अशी कल्कीची इच्छा आहे. या पद्धतीनुसार पाण्याखाली बाळाचा जन्म होतो. ही गर्भवतीसाठी कमी वेदनादायी पद्धत आहे. वर्षअखेरीस गोव्याला जाऊन डिलीव्हरी करण्याचा कल्कीचा मानस आहे.