'तारक मेहता का उल्टा चश्मा 'मध्ये दयाबेनची वापसी
तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पात्र दयाबेन लवकरच परत येणार आहे. येत्या नवरात्रीत म्हणजेच 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरच्या मध्ये दिशाची या शोमध्ये एंट्री होणार आहे. रिपोर्टनुसार प्रोड्युसर असित मोदी यांनी शेवटी दिशाच्या अटी मान्य करत या शोमध्ये परतण्याची तयारी केली आहे. तसेच दिशानंही प्रोडक्शन हाउसच्या अटी मान्य केल्या आहेत. या आधी पैशावरून दिशा आणि प्रोड्यूसर यांच्यात वाद असल्याचं बोललं जात होतं.
याआधी दिशा वकानीच्या बदली नवी दयाबेन शोधण्याचं काम सुरू होतं. मात्र या भूमिकेसाठी दिशापेक्षा जास्त चांगलं काम करू शकेल असं कोणी सापडली नाही. मात्र नुकत्याच दाखवलेल्या एका एपिसोडमध्ये दिशाच्या परत येण्याची हिंट देण्यात आली आहे. जेठालाल गणेशोत्सवाच्या वेळी दयाबेनला मिस करताना दाखवण्यात आलं आहे.