शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (13:22 IST)

Birthday Special : जेव्हा मुली काळ्या कपड्यांमध्ये देव आनंदला पाहण्यासाठी त्यांच्या छतावरून उडी मारत होत्या

Dev Anand Birthday Special When He Asked Not To Wear Black Suit In Public
एवरग्रीन सुपरस्टार देव आनंद आज भले या जगात नाही आहे, पण आपल्या ही दुनिया में न हों, पण त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांद्वारे, वेगळ्या शैलीने आणि चमकदार अभिनयातून तो लोकांमध्ये कायम जिवंत राहील. आजच्या दिवशी, 26 सप्टेंबर 1923 रोजी, देव आनंदचा जन्म शंकरगड, पंजाब (ब्रिटिश भारत) येथे झाला. देव साहबने आपल्या कारकीर्दीत 116 चित्रपटांत काम केले.  
1946 मध्ये आलेले चित्रपट 'हम एक हैं' तो हीरो म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने त्यांना इतर कलाकारांपासून नेहमीच दूर ठेवले. देव आनंदचे मात्र जेवढे कौतुक झाले तेवढेच काही लोकांनी त्याच्यावरही सवाल ही केले. 
आर के नारायण यांच्या कादंबरीवरील तयार झालेले चित्रपट गाइड आजही प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटाद्वारे प्रथमच लाइव्ह इन रिलेशनशिप दाखविण्यात आले. देव आनंदचा हा पहिला रंगीत चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
नेहमीच फॅशन आयकॉन असलेल्या देव आनंद साहेबांचे अनेक किस्से आहे. यातून एक किस्सा लक्षात राहण्यासारखा म्हणजे त्यांच्या कपड्यांवरील बंदी. देव आनंदने पांढरा शर्ट आणि काळा कोट इतका लोकप्रिय केला होता की लोक त्याची कॉपी करू लागले होते. मग एक काळ असा ही आला जेव्हा सार्वजनिक जागेवर काळा कोट घालण्यास बंदी घातली गेली. अशी अफवा होती की मुली काळ्या कपड्यांमध्ये देव आनंदला पाहण्यासाठी त्यांच्या छतावरून उडी मारत असत.
बॉलीवूडचे कोहिनूर म्हणून ओळखले जाणारे देव साहिब यांना अभिनय आणि दिग्दर्शनात महारात होती. त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आधुनिक बनवण्याच्या दृष्टीने पाउले उचलले होते. हिंदी चित्रपटात नवीन अभिनेत्री सुरू करण्याचा ट्रेड देव साहेबांपासूनच सुरू झाला. 3 डिसेंबर 2011 रोजी लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.