सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (11:39 IST)

'प्यार दो प्यार लो' या गाण्याचा टीझर सोशल मिडीयावर चर्चेत

अभिनेत्री नोरा फतेही 'प्यार दो प्यार लो' या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नोराचं हे गाणं अभिनेत्री तारा सुतारिया, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख स्टारर 'मरजावां' चित्रपटातील आहे. 
 
ट्रेंड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी 'प्यार दो प्यार लो' गाण्याचं टीझर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून शेअर केलं आहे. 'मरजावां' चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केलं आहे. तर निर्मिती भूषण कुमार,निखिल अडवाणी, दिव्या खोसला-कुमार, कृष्णा कुमार यांनी केली आहे.
 
त्याचप्रमाणे नोरा अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्ध कपूर सोबत 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटात भूमिका मुख्य साकारणार आहे. २४ जानेवारी २०२० मध्ये 'स्ट्रीट डान्सर' चित्रपट गृहात दाखल होणार आहे.