सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (09:31 IST)

रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’

भारतीय रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी चित्रपटांच्या प्रमोशनची मदत घ्यायचं ठरवल आहे. आता निर्मात्यांना चित्रपटांच्या प्रमोशनसाठी रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. या योजनेला ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ असे संबोधण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जाहिरातीच्या माध्यमांतून कला, संस्कृती, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, खेळ इत्यादींच्या प्रचारासाठी विशेष ट्रेन्स उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याची सुरुवात अक्षयकुमार अभिनित हाऊसफुल-४ या चित्रपटापासून करण्यात आली आहे.
 
या योजनेंतर्गत पहिली विशेष ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ ही ट्रेन हाऊसफुल-४ चित्रपटाची टीम आणि माध्यम प्रतिनिधींना घेऊन बुधवारी मुंबई सेन्ट्रल येथून निघणार असून गुरुवारी नवी दिल्ली येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण ८ डब्बे असतील, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.