1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जुलै 2025 (17:21 IST)

चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यु

Rest in Peace
दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध स्टंटमॅन एसएम राजू यांचे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघातात निधन झाले. 13जुलै रोजी ते एक धोकादायक कार स्टंट करत होते, तेव्हा हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. 
एसएम राजू हे अभिनेता आर्यच्या आगामी 'वेट्टुवम' चित्रपटासाठी एका स्टंट सीनचे चित्रीकरण करत होते. सीन दरम्यान त्यांना एका रॅम्पवर वेगाने एसयूव्ही कार चालवावी लागली आणि ती उलटावी लागली. जेव्हा कार हवेत उलटली तेव्हा वाहनाचा तोल गेला आणि अनेक वेळा उलटल्यानंतर ती जमिनीवर आदळली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.
काही सेकंदांसाठी त्यांच्यात  काहीच हालचाल झाली नाही तेव्हा, शूटिंग टीम राजूला मदत करण्यासाठी धावली. त्यांना  गाडीतून बाहेर काढले तोपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना  ताबडतोब नागापट्टिनम येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एसएम राजू, ज्यांचे खरे नाव मोहन राज होते, ते तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील रहिवासी होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये स्टंटमन म्हणून काम करत होते. 52 वर्षीय राजू यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट केले होते आणि ते इंडस्ट्रीमध्ये एक विश्वासार्ह नाव बनले होते. आज भारतीय चित्रपटांमध्ये मोठे स्टंट सीन्स सामान्य आहेत, परंतु या धोकादायक दृश्यांमागे काम करणाऱ्या कलाकारांची सुरक्षितता अनेकदा धोक्यात असते.स्टंट कलाकारांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. 
Edited By - Priya Dixit