शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (15:06 IST)

आता आयुष्मान खुरानाला करायचे आहे निगेटिव्ह रोल

आयुष्मान खुरानाने आतापर्यंत “विकी डोनर’, “बधाई हो’ आणि “अंधाधुन’ सारख्या सिनेमांचा समावेश आहे. “विकी डोनर’ आणि “अंधाधुन’ हे सिनेमे तर स्वतः आयुष्मान खुरानाही इतके प्रिय आहेत की या सिनेमांच्या स्क्रीप्ट तो एखाद्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवायला तयार आहे. सलग 6 सिनेमे सुपरहिट झाल्यामुळे आयुष्मान भलताच फॉर्मात आला आहे.
 
एक “आर्टिकल 15′ चा अपवाद सोडला तर त्याने कॉमेडी रोलच अधिक प्रमाणात केले आहेत. त्याच्या “ड्रीमगर्ल’ लाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. पण त्याला आता निगेटिव्ह रोल करायचा आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या हॉलिवूडचा “जोकर’चा जर हिंदी रिमेक झाला, तर त्यातील खलनायकाचा रोल करायला आपल्याला आवडेल, असे तो एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हणाला होता.
 
आपल्यातील डार्क साईड अद्याप प्रेक्षकांच्या समोर आलेली नाही. पण “जोकर’मधील व्हिलन करायचा म्हणजे तसाच प्रतिभाशाली डायरेक्‍टर असायला हव, जो या हिंदी रिमेकला न्याय देऊ शकेल. तशी संधी मिळाली तर आपण नक्की व्हिलन करू असे आयुष्मान म्हणाला. याशिवाय स्वतःचा एक कविता संग्रह प्रकाशित करण्याचीही त्याची ईच्छा आहे.